हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या आलिया भट्टच्या (Alia Bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाला असून चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. पहिल्यापासूनच हा चित्रपट जोरदार चर्चेत होता. चित्रपटाची कथा आणि आलिया भट्टचा अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते. मात्र या चित्रपटाबद्दल कंगना रणौतने (Kangana Ranaut) केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. कंगनाने चित्रपटातील आलिया भट्टच्या निवडीवर जोरदार टीका करत, तिला ‘पापा की परी’ असे म्हणत डिवचले होते. याआधीही कंगनाने अनेक अभिनेत्रींना अशा प्रकारे अपमानित केले आहे.
अभिनेत्री कंगना रणौत आणि वाद हे प्रकरण काही नवीन नाही. कंगना आपल्या अभिनयासाठी तर प्रसिद्ध आहेच पण यापेक्षा जास्त ती तिच्या वादामुळे नेहमीच चर्चेत असते. हिंदी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांशी तिचा छत्तीसचा आकडा आहे. अगदी करण जोहर (Karan Johar) पासून आलिया भट्टपर्यंत अनेकांशी तिने पंगा घेतला आहे. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. कोण आहेत या अभिनेत्री चला जाणून घेऊया.
दीपिका पदुकोण (Deepika Padukone)
कंगना रणौत आणि दीपिका पदुकोण यांचा वाद खूप दिवसापासून सुरू आहे. कंगनाने अनेकवेळा दीपिकाला टार्गेट केले आहे. अलीकडेच तिने दीपिका पदुकोणच्या ‘गहराइयां’ चित्रपटाबद्दल बोलताना “तुम्ही पॉर्न दाखवली तरी हा चित्रपट चालणार नाही” असे धक्कादायक वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्याने कंगना आणि दीपिका वाद चांगलाच रंगला होता.
तापसी पन्नू (Taapsee Pannu)
अभिनेत्री तापसी पन्नूवर देखील कंगनाने थेट हल्ला चढविला होता. तिच्याबद्दल बोलताना कंगनाने तापसी प्रत्येक गोष्टीत माझी कॉपी करत असल्याचे म्हटले होते. इतकेच नव्हे तर तिने तापसीला स्वस्त कॉपी असेही म्हटले होते.
उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar)
९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या उर्मिलालाही कंगनाने ट्रोल केले होते. उर्मिलाबद्दल बोलताना कंगनाने ती सॉफ्ट पॉर्नस्टार असल्याचे धक्कादायक विधान केले होते. ज्यामुळे चांगलाच वाद रंगला होता.
जया बच्चन (Jaya Bachchan)
प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्यावरही कंगनाने टीका केली होती. जया बच्चन यांनी लोकसभेत बॉलिवूड विरोधात आवाज उठवला होता, त्यावेळी तिने त्यांच्यावर निशाणा साधला होता.
ऋचा चड्डा (Richa Chadha)
अभिनेत्री ऋचा चड्डा आणि कंगना रणौत यांच्यातील वादही चांगलाच रंगला होता. अनेक चित्रपटात एकत्र काम करूनही रिचावर कंगनाने जोरदार टीका केली होती.
हेही वाचा-