अभिनेत्री करीना कपूर तिच्या खास स्टाईलसाठी कायमच ओळखली जाते. दोन मुलांच्या जन्मानंतरही करीनाच्या फॅशनमध्ये आणि स्टाईलमध्ये किंचितही बदल झालेला नाही. करीना तिच्या खास ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने तिची ही फॅशन आणि स्टाईल प्रेग्नंसीमध्ये देखील कायम ठेवत मीडियाचे आणि फॅन्सचे लक्ष वेधून घेतले होते. करीना तिच्या फॅशन, स्टाईलसोबतच तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते.
करीनाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो कपूर घरात झालेल्या डिनर पार्टीचे आहेत. नीतू कपूर यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या डिनर पार्टीमधील हे फोटो सोशल मीडियावर भरपूर गाजत आहेत. या फोटोंमध्ये कपूर कुटुंबासोबतच आलिया भट्ट तिच्या परिवारासोबत दिसत आहे. मात्र, असे असूनही चर्चा फक्त आणि फक्त करीना कपूरचीच होत आहे. करीनाचे व्यक्तिमत्त्वच तिने असे ठेवले आहे की, ती जिथे जाते तिथे सर्व लाईमलाईट घेऊन जाते. आता नीतू कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर आणि कपूर खानदानातल्या इतर मोठ्या व्यक्ती असूनही चर्चा फक्त ‘बेबो’चीच होतेय.
नीतू कपूरच्या बर्थडे पार्टीमध्ये करीनाने ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक ब्रालेट आणि क्रीम कलरचे ब्लेझर घातले आहे. करीना काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्यांदा आई झाली. मात्र, तिला पाहून कोणीही बोलणार नाही की, ती दोन मुलांची आई आहे. प्रेग्नंसी दरम्यान तिचे वाढलेले वजन तिने पुढच्या काही दिवसातच कमी केले. त्यामुळे करीना सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे.
Last night Kareena Kapoor Khan was seen at Neetu Kapoor’s birthday party with her family #KareenaKapoorKhan #KareenaKapoor pic.twitter.com/jtzJefAP2L
— MegastarKareenaKapoor (@MegaStarKareena) July 8, 2021
या पार्टीमध्ये रणबीरची कथित गर्लफ्रेंड असलेली आलिया तिच्या आई आणि बहिणीसोबत पोहोचली होती. सोबतच रिद्धिमा कपूर, करिश्मा कपूर असून देखील सोशल मीडियावर फक्त करीनाच करीना आहे आणि तिच्या पार्टी लूकची चर्चा.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘यार गजब आहेस तू’, श्रुती मराठेच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची झक्कास कमेंट
-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’