Saturday, July 6, 2024

करीनाला किस करत होता सैफ, तेवढ्यात अभिनेत्रीने खेळला मोठा डाव, एकदा पाहाच

बॉलिवूडमधील ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखले जाणारे जोडपे म्हणजे करीना कपूर खान आणि सैफ अली खान होय. करीना नेहमीच तिच्या कामाव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत असते. करीना कधी कधी तिच्या तैमुर आणि जेह या मुलांमुळेही चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावरही चांगलाच वावर आहे. करीनाला इंस्टाग्रामवर ९३ लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळे तिने शेअर केलेली कोणतीही पोस्ट व्हायरल होण्यास जास्त वेळ लागत नाही. अशात करीनाने सैफसोबतचा किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बीचवर घेतली सेल्फी
करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने पती आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यासोबत एक सेल्फी शेअर केला आहे. हा फोटो बीचवरील आहे. फोटोत करीना मेकअपविना दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने ३ फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही बीचचा आनंद लुटताना दिसत आहेत.

सैफने केली किस
या फोटोत करीना आणि सैफ यांनी जॅकेट परिधान केल्याचे दिसत आहे. दोघेही मजेशीर अंदाजात दिसत आहेत. या फोटोत करीना सेल्फी घेताना दिसत आहे. तसेच, सैफ करीनाला किस (Saif Kareena Kiss) करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही फोटोत करीनाने मेकअप केला नाहीये. तिने हा फोटो शेअर करताच काही वेळातच व्हायरल झाला आहे. तिच्या या फोटोवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

काय आहे कॅप्शनमध्ये खास?
करीनाने सैफसोबतचे हे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोला खास कॅप्शन देत तिने  लिहिले की, “बीचवर जॅकेट आणि किस… इंग्रजी चॅनेल.” यासोबतच तिने हॅशटॅगसोबत लिहिले की, “इंग्लंडमध्ये हाच उन्हाळा आहे का?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) 

करीनाच्या या पोस्टवर कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “सुंदर, माशाल्लाह कुणाचीही नजर लागू नये.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “तुम्ही दोघेही खूप छान दिसत आहात.”

करीना आणि सैफचे सिनेमे
करीना आणि सैफ यांच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता आमिर खान आहे. तसेच, सैफबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘विक्रम वेधा’ या सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

नाटकाच्या माध्यमातून ‘महाभारत’ जगाला समजून सांगणाऱ्या ब्रिटीश दिग्दर्शकाला देवाज्ञा, सिनेसृष्टीवर शोककळा

‘या’ दिग्दर्शकापुढे धर्मेंद्र आणि अमिताभ यांचीही बोलती व्हायची बंद, वाचा गाजलेला किस्सा

वैवाहिक आयुष्यात आयुष्मान खुराना नाही सुखी म्हणाला ‘लग्न माझ्या आयुष्यातील मोठी चूक’

हे देखील वाचा