सामान्य व्यक्तींना नेहमीच आलिशान आयुष्य जगणाऱ्या बॉलिवूड कलाकारांबाबत उत्सुकता असते. त्यांची एक झलक पाहण्यासाठीही चाहते आतुर असतात. अशावेळी अनेकदा कलाकारांना चाहत्यांची ही उत्सुकता महागात पडते. असेच काही बॉलिवूडचे पॉवर कपल म्हणून ओळखले जाणाऱ्या सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्याबाबत झाले होते. ही घटना वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
होय, बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या घरात एक अनोळखी महिला घुसली होती. विशेष म्हणजे, हा किस्सा खुद्द सैफ अली खान याने सांगितला होता. या घटनेवर करीनाची काय प्रतिक्रिया होती, याचाही उल्लेख सैफने केला.
सैफ आणि करीना (Saif And Kareena) मागील वर्षी आपल्या वांद्रे येथील नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. यापूर्वी ते दोघेही फॉर्च्युन हाईट्स अपार्टममेंटमध्ये राहायचे. यशराज फिल्म्स यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरील एका जुन्या व्हिडिओत सैफने राणी मुखर्जी (Rani Mukherji) हिच्यासोबत आपल्यासोबत घडलेल्या घटनेबाबत सांगितले होते. सैफ सांगतो की, “आमच्या घराची बेल वाजली, मी दरवाजा उघडला, तेवढ्यात एक अनोळखी बाई घरात शिरली आणि म्हणाली, ‘अच्छा, तुम्ही इथेच राहता.'”
यावर राणी मुखर्जी हैराण होऊन म्हणाली की, तिला सैफच्या घरी कसे काय येऊ दिले. यावर सैफ म्हणतो की, “मला माहिती नाही, ती पूर्ण आत्मविश्वासाने थेट आमच्या घरात आली. तिने चांगले कपडे घातले होते. काही चुकीचं वाटत नव्हतं. त्यामुळे तिला कुणी रोखले नाही.”
सैफ पुढे सांगतो की, “मी आणि करीना तिच्याकडे लक्ष देऊन पाहत होतो. यानंतर माझ्याकडे बघून करीना म्हणाली, ‘तू काही बोलणार नाहीस का?'” सैफने सांगितले की, “एक बाई अशाप्रकारे घरात आल्याने मी खूप घाबरलो होतो आणि काय करावे हे मला समजत नव्हते आणि विचार करत होता की, मला हे माहित आहे का? मी म्हणालो की, तू इथे काय करत आहेस, त्यावर ती बाई ठीक आहे म्हणाली आणि मग वळून बाहेर गेली.”
फक्त सैफ आणि करीनाच नाही, तर कोणाच्याही घरात अशाप्रकारे अनोळखी व्यक्ती घुसल्यानंतर कोणीही घाबरेल. यादरम्यान राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांनी आपल्या सिनेमा आणि यशराज यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला होता.
सैफ अली खानच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘विक्रम वेधा’ आणि ‘आदिपुरुष’ या सिनेमांमध्ये झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-