Saturday, June 15, 2024

अमिताभ बच्चन यांना ‘वाईट व्यक्ती’ समजू लागली होती करीना कपूर, बिग बींनी पाय धुतल्यावर बदलले मत

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या चाहत्यांबरोबर काही ना काही शेअर करत असतात. ते अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देत फोटो शेअर करत असतात आणि त्यांच्याशी संबंधित काहीना काही चाहत्यांना सांगत असतात. एकदा त्यांनी सांगितले की, करीना कपूर त्यांना वाईट व्यक्ती समजू लागली होती. यानंतर जेव्हा अमिताभ यांनी तिचे पाय धुतले तेव्हा करिनाचा त्यांच्याबद्दलचा समज बदलला. जाणून घ्या काय होते संपूर्ण प्रकरण.

रणधीर कपूर यांना वाचवत होती करीना
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ‘पुकार’ (१९८२) चित्रपटातील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, जेव्हा त्यांनी रडणाऱ्या करीनाचे पाय धुतले तेव्हा तिला खात्री पटली की, ते वाईट व्यक्ती नाहीत. २०१३ मधील या घटनेचा उल्लेख त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये केला होता. शूटिंगदरम्यान अमिताभ यांनी रणधीर कपूर यांना मारहाण केली, तेव्हा छोटी करीना चांगलीच नाराज झाली. अमिताभ यांनी लिहिले की, करीनाने रणधीर यांना त्यांच्या बुक्क्यांपासून वाचवण्यासाठी घट्ट पकडले होते.”

बिग बींनी धुतले होते करीनाचे  पाय
ते म्हणाले की, “अश्रूंनी भरलेली आणि खूप काळजीत, ती खूप अस्वस्थ झाली होती. तिचे छोटे सुंदर पाय वाळूने भरलेले होते. तिचे थोडे मनोरंजन करण्यासाठी मी पाणी मागितले आणि तिचे छोटे पाय स्वच्छ केले. मला वाटते पाय धुतल्यानंतर तिचे माझ्याबद्दलचे मत बदलले होते. त्यानंतर मी तिच्या मनात वाईट व्यक्ती नव्हतो राहिलो. हे तिला अजूनही हे आठवते.”

अमिताभ बच्चन यांनी फोटो केला होता शेअर
अमिताभ यांनी २०१९ मध्ये एक फोटो शेअर केला होता. हा फोटो ‘पुकार’च्या सेटवरील होता. यामध्ये करीना रडताना दिसली. अमिताभ यांनी लिहिले होते, “ओळखा कोण आहे? गोव्यातील ‘पुकार’च्या सेटवर ही करीना आहे. वडील रणधीर कपूर यांच्यासोबत आली होती. तिच्या पायाला दुखापत झाली आणि आम्ही तिच्या पायाला औषध लावत होतो.” अमिताभ बच्चन नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर असे अनेक मजेशीर किस्से शेअर करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा