Thursday, April 18, 2024

‘मिस यू..,’ म्हणत मुग्धा वैशंपायनने काढली प्रथमेश लघाटेची आठवण; म्हणाली…

मराठी सिंगिंग रिऍलिटी टीव्ही शो ‘सारेगमप लिटील चॅम्प‘ प्रचंड गाजला आहे. या शो मध्ये अनेक गायक दिसले. या शो मधील प्रसिध्द गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनची जोडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. त्या दोघांनी गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तेव्हापासून ते दोघे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चा पहिला सीझन खूर गाजला होता. आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांच्या आवाजाने संपुर्ण महाराष्ट्रला वेड लावले. यातील प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी त्यांच्या नात्याची जाहिर घोषणा केली. त्यानंतर त्यांचे चाहते खूप खूश झाले होते. प्रथमेश लघाटेने पोस्ट करून त्यांच्या नात्याची जाहिर कबुली दिली.

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा अनेकदा एकत्र दिसले. त्या दोघांनी अनेक कार्यक्रमात एकत्र गाणी गायली आहेत. नुकतीच मुग्धा (mugdha vaishampayan)  गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली आहे. मुग्धा पुण्यात गाण्याच्या कार्यक्रमासाठी गेली आहे. यावेळी तिला प्रथमेशची खूप आठवण येत आहे. तिने एक स्टोरी इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मुग्धाने पुण्यात एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. त्यावेळी जेवताना तिला प्रथमेशची खूप आठवण येते. त्यादरम्यान, तिने एक स्टोरी टाकली आहे. मुग्धाने पोळी, भजी, कोशिंबीर, विविध भाज्या, ताक गुलाबजाम आणि पाणीपुरी याने भरलेलं ताटाचा फोटो स्टोरीला टाकला आहे. कारण प्रथमेशही खूप फूडी आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की,“मिस्ड यू प्रचंड…!”

दरम्यान, ‘सारेगमप लिटील चॅम्प‘ च्या पहिल्या पर्वाने चाहत्यांना वेड लावलं होतं. रामायण, महाभारत या दोन मालिकांनंतर अनेक वर्षांनी घराघरात या लहान मुलांच्या गाण्याचा कार्यक्रम प्रेक्षक आवडीने पाहायचे. प्रथमेश लघाटेला या पर्वाने मोदक असे टोपण नाव दिले. हे सर्व लिटील चॅम्प्स आता मोठे झाले आहेत. काही ना काही निमित्ताने ही सर्व मंडळी टी.व्ही., न्यूज चॅनेलमधुन झळकत असतात. (television Saregump Little Champ mugdha vaishampayan missed prathamesh laghate while having lunch)

अधिक वाचा-     
गरोदर सना खानची ‘अशी’ झालीये अवस्था, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल
सीझेन खानसोबतच्या डेटिंगच्या बातम्यांवर श्वेता तिवारीची प्रतिक्रिया, म्हणाली,’मी त्याला…’ 

हे देखील वाचा