प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय असतो. यामध्ये कलाकारांचाही समावेश होतो. सोशल मीडिया वापरल्याशिवाय अनेक कलाकारांचा दिवसही जात नाही. ते दररोज फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. या कलाकारांमध्ये कपूर घराण्याची अभिनेत्री करिश्मा कपूर हिचाही समावेश होतो. करिश्माही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते. तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स मिळतात. अशात तिने एक नवीन फोटो शेअर करत सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.
संपूर्ण जगाने 2022ला निरोप दिला आणि 2023चे स्वागत केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अनेक कलाकारांनी भारतात, तर काहींनी परदेशात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले. अशात करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हीदेखील मुंबईतून बाहेर पडली आणि तिच्या एका फोटोने खळबळ माजवली. तिचा एक फोटो पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की, ती 48 वर्षांची आहे.
करिश्माने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान रविवारी (दि. 01 डिसेंबर) एक सेल्फी फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये “नवीन सुरुवातीच्या जादूवर विश्वास ठेवा. नवीन वर्षांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…! 2023,” असे लिहिले. या फोटोत करिश्मा काळ्या रंगाच्या बिकिनीत दिसत आहे.
View this post on Instagram
कमेंट्सचा वर्षाव
करिश्माच्या या फोटोवर नेटकऱ्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. डिझायनर मनीष मल्होत्रा याने हार्ट इमोजी कमेंट केला आहे. तसेच, कोंकणा सेन शर्मा हिने फायर इमोजी कमेंट केली आहे. चाहतेही करिश्माच्या अंदाजावर फिदा झाले आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “ती 90ची मुलगी नाहीये, ती 2030ची मुलगी आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “तू माझी सार्वकालीन क्रश आहेस.”
करिश्मा हिचे वय 48वर्षे असून तिच्या या फोटोवर चाहते अक्षरश: फिदा झाले आहेत. खरं तर, 29 डिसेंबर रोजी करिश्मा तिचा मुलगा कियानसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. त्यानंतर तिची मुलगीही विमानतळावर स्पॉट झाली होती.
सन 1991मध्ये केले होते पदार्पण
अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा जन्म 25 जून, 1975 रोजी झाला आहे. तिने सन 1991मध्ये ‘प्रेम कैदी’ या सिनेमातून सिने कारकीर्दीची सुरुवात केली होती. नव्वदच्या दशकात करिश्मा ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. सन 2003मध्ये तिने व्यावसायिक संजय कपूर याच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र, 2016मध्ये तिने अधिकृतरीत्या पतीला घटस्फोट दिला होता. सध्या करिश्मा सोशल मीडियावर सक्रिय असते. (actress karisma kapoor shares bikini pic from new year vacation photo viral)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘याची गरुड पुराणात वेगळी शिक्षा आहे’, रानू मंडलचा बाईकवरील रोमँटिक व्हिडिओ पाहून संतापला नेटकरी
आख्खं 2022 वर्ष संपलं, पण ‘या’ 5 दमदार भूमिका गेल्या भाव खाऊन; एका क्लिकवर घ्या जाणून