Friday, December 8, 2023

सेटवर करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये सुरू होता वाद, दिग्दर्शकांनी केला ‘हा’ जालिम उपाय

राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘अंदाज अपना अपना’ हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा फ्लॉप ठरला होता, पण नंतर जेव्हा तो टीव्हीवर प्रसारित झाला तेव्हा प्रेक्षकांना तो खूप आवडला. चित्रपटातील जबरदस्त कॉमेडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात आमिर खान (Aamir Khan), सलमान खान (Salman Khan), रवीना टंडन (Raveena tandon), करिश्मा कपूर(Karishma Kapoor) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांनी भूमिका साकारल्या होत्या . गोविंदा आणि जुही चावला यांनीही काम केले होते. एवढ्या मोठ्या कलाकारांना घेऊन परिपूर्ण चित्रपट बनवणे दिग्दर्शकासाठी सोपे नव्हते. जेव्हा हा चित्रपट बनत होता, तेव्हा आमिर आणि सलमान एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांशी जुळत नाहीत अशा अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र सत्य काही वेगळेच होते. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ.

हिंदी सिनेजगतातील कलाकार आणि त्यांच्यातील वादाच्या बातम्या अनेकदा सोशल मीडियावर ऐकायला मिळत असतात.यामध्ये अनेकदा अशा बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असल्याचेही सिद्ध झाले आहे. अशाच काही बातम्या 1993 साली ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चर्चेत होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला होता. राजकुमार संतोषी यांनी सांगितले होते की, “त्यावेळी आमिर खान आणि सलमान खान यांच्यात आलबेल नसल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या, पण ते खरे नव्हते. दोघेही सेटवर चांगले मित्र होते, एवढेच नाही तर त्यांनी एकमेकांना खूप मदतही केली. मात्र, त्यांच्यात फूट पडल्याची बातमी वाचायला मिळायच्या. आयला-उईमा म्हणत दोघेही इतके हसायचे की शॉट्स स्किप करायचे, अशी दोघांची मैत्री होती.”

राजकुमार संतोषी म्हणाले की, “हा वाद त्यांच्यात नाही तर चित्रपटातील अभिनेत्रींमध्ये नक्कीच होता. रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यात वाद होता, परंतु दोघीही त्यांच्या शूटसाठी प्रामणिक होत्या. त्या एकमेकांशी बोलत नसत, शूटिंगदरम्यान दोघींनाही काही बोलायचं असेल तर त्या माझ्यामार्फत सांगायच्या. “याबाबत बोलताना संतोषी म्हणाले की “एकदा असे घडले की एका सीनमध्ये त्यांचे दोन्ही हात बांधले गेले होते. दोघीही एकमेकांशी बोलत नव्हते, म्हणून मी ओरडून म्हणालो की थेट एकमेकांशी बोला. जेव्हा आम्ही शॉटसाठी दिवे बदलत होतो, तेव्हा मी क्रू मेंबरला सांगितले की त्या एकमेकांशी बोलत नाहीत तोपर्यंत त्यांचे हात उघडू नका.” आणि यामुळेच त्यांच्यातील वाद संपुष्टात आला होता.

हेही वाचा-
निवेदिता सराफ यांना आली लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आवडत्या डिशची आठवण, सांगितली खास गोष्ट
जेव्हा भावासोबतच जोडले गेले होते नाव, अभिनेत्री रवीना टंडनच्या आयुष्यातील ‘तो’ रंजक किस्सा

हे देखील वाचा