Tuesday, January 31, 2023

आख्खं 2022 वर्ष संपलं, पण ‘या’ 5 दमदार भूमिका गेल्या भाव खाऊन; एका क्लिकवर घ्या जाणून

आता 2022 हे वर्ष संपलं आहे आणि 2023 वर्षाला दिमाखात सुरुवात झाली आहे. असे असले, तरीही मागील वर्षात बॉलिवूडमध्ये काय काय घडले, कोणत्या कलाकारांच्या अभिनयाला दाद मिळाली, बॉक्स ऑफिसवर कुणाची गाडी सुसाट सुटली या सर्व गोष्टींचा आढावा घेण्याची ही वेळ आहे. मागील वर्षात बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे आले, ज्यात कलाकारांनी प्रेक्षकांवर अभिनयाची मोहिनी केली. या लेखातून आपण टॉप 5 दमदार अभिनयाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

ऋतिक रोशन
सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याचा 2022मध्ये फक्त एक सिनेमा रिलीज झाला. तो सिनेमा म्हणजेच ‘विक्रम वेधा’ होय. या सिनेमात ऋतिकने वेधा ही भूमिका साकारली होती, जो एक गँगस्टर असतो. या सिनेमात त्याच्या विरुद्ध बाजूला सैफ अली खान (Saif Ali Khan) हा होता. या सिनेमात ऋतिकने साकारलेल्या वेधा या पात्राची तुफान वाहवा झाली. एवढेच नाही, तर ऋतिकने आतापर्यंत साकारलेल्या सर्वात भन्नाट पात्रांमध्ये या भूमिकेने जागाही मिळवली.

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिचा एकाच पठडीतील सिनेमे न करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. दीपिकाने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामध्ये ‘गेहराईयां’ या सिनेमातील ‘अलिशा’ या पात्राचाही समावेश होतो. या सिनेमात दीपिकाने खूपच इंटीमेट सीन दिले होते, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. यासोबतच या सिनेमातून मानसिक आजारांबाबत जागरुकता पसरवण्याचेही काम करण्यात आले. दीपिकासारख्या अनुभवी आणि प्रगल्भ अभिनेत्रीने तिच्या भूमिकेला न्याय दिला, जो प्रेक्षक आणि तिच्या चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

आलिया भट्ट
सन 2022 मध्ये दमदार अभिनय साकारणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिच्या नावाचाही समावेश होतो. आलियाचे मागील वर्षी एकापेक्षा जास्त रिलीज झाले. जसे की, ‘ब्रह्मास्त्र’, ‘गंगुबाई काठियावाडी’ होय. ब्रह्मास्त्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. मात्र, गंगुबाई काठियावाडीमधील तिच्या अभिनयाला जगभरातून प्रेम मिळाले.

अजय देवगण
सुपरस्टार्समध्ये गणल्या जाणाऱ्या अजय देवगण (Ajay Devgn) याचाही या यादीत समावेश होतो. मागील वर्षी ‘दृश्यम 2’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या शानदार स्टोरीने सर्वांचे लक्ष वेधले. या सिनेमात अजयने साकारलेल्या भूमिकेला त्याने जबरदस्त दाद दिली. त्यामुळे प्रेक्षकांनी त्याच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव केलाच, पण त्याचसोबत बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा जबरदस्त चालला. या सिनेमाने 300 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे, यावर्षी अजयने अनेक सिनेमात दमदार पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. त्यात ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘आरआरआर’ यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त त्याने ‘रनअवे 34’ आणि ‘थँक गॉड’ यांसारखे सिनेमेही दिली. यामध्ये त्याच्या अभिनयाने चाहत्यांना अजिबात निराश केले नाही.

कार्तिक आर्यन
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याने 2022मध्ये एकूण 2 सिनेमात काम केले, जे एकमेकांशी एकदम वेगळे होते. त्यातील एक म्हणजे, ‘भूल भुलैय्या 2’ होय. या सिनेमाने प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाण्यास भाग पाडले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली. दुसरा सिनेमा म्हणजे, ‘फ्रेडी’ होय. या सिनेमातील त्याच्या अभिनयाने समीक्षकांचेही मन जिंकले. (Looking Back At Some Of The Best Acts In Hindi Cinema This Year 2022)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विषये का! 2022मधील सर्वात श्रीमंत अभिनेते, फ्लॉप सिनेमे देऊनही कमावला बक्कळ, ‘हा’ पठ्ठ्या अव्वलस्थानी
वरुणने वाघासोबत, तर अनुष्काने कुटुंबासोबत म्हटले 2022ला बायबाय, पाहा कलाकारांच्या हटके पोस्ट

हे देखील वाचा