अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हे अधिकृतरीत्या पती-पत्नी बनले आहेत. गुरुवारी (९ डिसेंबर) हे जोडपे राजस्थानमध्ये विवाहबंधनात अडकले आहेत. दरम्यान, कंडोम कंपनी ड्युरेक्सने सोशल मीडियावर विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाबाबत एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून तुम्हालाही हसू येईल. ही पोस्ट इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
अशी पोस्ट कंपनीने केली शेअर
ड्युरेक्स कंपनीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर करण्यात आली असून, त्यात लिहिले आहे की, “प्रिय विकी आणि कॅटरिना, जर आम्हाला नाही बोलावले, तर हा एक विनोद असेल.” या पोस्टवर युजर्स मजेशीर कमेंट करत आहेत. विकी आणि कॅटरिना सुरुवातीपासूनच त्यांच्या लग्नाबाबत काळजी घेत आहेत. या जोडप्याने आपल्या लग्नात फक्त निवडक पाहुण्यांनाच बोलावले होते आणि त्याचबरोबर पाहुण्यांची यादी देखील गुप्त ठेवण्यात आली होती. कदाचित याच कारणास्तव कंपनीने विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाबद्दल टोमणा मारला आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
युजर्स कमेंट करताना घेत आहेत मजा
युजर्स या पोस्टवर कमेंट करून खूप मजा घेत आहेत. एका युजरने लिहिले की, “अरे भाऊ.” दुसर्याने लिहिले, “हे जास्तच वैयक्तिक होत आहे.” आणखी एकाने लिहिले, “हे लग्नाचे बेस्ट मिम आहे, गुरू.” याआधी या कंपनीने विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोण-रणवीर सिंग यांच्या लग्नाबाबतही अशा पोस्ट केल्या आहेत, ज्याची खूप चर्चा झाली होती.
विकी-कॅटरिनाने घेतले सात फेरे
गुरुवारी (९ डिसेंबर) विकी आणि कॅटरिना राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा येथे सात फेरे घेतले. लग्नानंतर कॅटरिना आणि विकी हनीमूनसाठी मालदीवला रवाना होणार असल्याचे बोलले जात आहेत. मात्र, त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगचे वेळापत्रक पाहता त्यांचे हनीमून लांबण्याची शक्यता आहे.
हे जोडपे ‘या’ ठिकाणी देणार भव्य रिसेप्शन
माध्यमांतील वृत्तांनुसार, विकी आणि कॅटरिना त्यांच्या मित्रांसाठी मुंबईतील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये एक भव्य रिसेप्शन देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाला १२० पाहुणे उपस्थित होते. या जोडप्याच्या हायप्रोफाईल लग्नात सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे १०० बाऊन्सर तैनात करण्यात आले होते.
हेही वाचा-










