Saturday, June 15, 2024

कॅटरिना अन् विकीच्या लग्नातील पाहुण्यांची यादी उघड; ‘या’ कलाकारांना आमंत्रण, सलमान खानवर सस्पेन्स

बॉलिवूडच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या जोडप्याच्या शाही लग्नाला कोणते बॉलिवूड कलाकार उपस्थित राहणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. तर आता त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांनी लग्नाला कोणकोणते कलाकार उपस्थित राहणार आहेत, याची यादी जाहीर केली आहे.

‘हे’ कलाकार कॅटरिना-विक्कीच्या लग्नाला लावणार हजेरी
माध्यमांतील वृत्तानुसार, कॅटरिना आणि विकीच्या लग्नातील पाहुण्यांची यादी उघड झाली आहे. राजस्थानमध्ये ९ डिसेंबरला होणाऱ्या या विवाहसोहळ्यात बॉलिवूडचे बडे कलाकार पाहुणे म्हणून येणार आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, आलिया भट्ट, करण जोहर, सलमान खान, कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

आता हे कलाकार विकी-कॅटरिनाच्या लग्नाला हजेरी लावतील की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. बॉस्को हा कॅटरिनाचा जवळचा मित्र आहे. त्यामुळे तो निश्चितच लग्नाच्या बंधनात सहभागी होणार असल्याचे मानले जात आहे. करण जोहर रॉयल वेडिंगमध्ये सहभागी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. कॅटरिनाचा एक्स बॉयफ्रेंड आणि जवळचा मित्र सलमान खानच्या उपस्थितीवर सस्पेन्स कायम आहे.

कॅटरिनाच्या लग्नात सलमान खान येणार का?
विकी-कॅटरिनाच्या लग्नाच्या तारखेच्या आसपास सलमान खानचे रियाधमध्ये दबंग टूर आहे. कार्यक्रमाची तारीख १० डिसेंबर आहे. दबंग टूरसाठी सलमानची कमिटमेंट पक्की आहे. अशा परिस्थितीत तो कॅटरिनाचे लग्न आणि टूर कसे मॅनेज करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींशिवाय विकी-कॅटरिनाचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. राजस्थानमध्ये ७ ते ९ डिसेंबर दरम्यान लग्नसोहळा पार पडणार आहे. यानंतर हे जोडपे मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टी देणार आहे. ज्यामध्ये फिल्मी जगतातील मोठी नावे सहभागी होणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा