Saturday, June 15, 2024

‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

आजकाल सिनेसृष्टीमध्ये लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अनेक जोडपी रेशीमगाठीत अडकत आहेत, तर काहीजण लग्नाची तयारी करत आहे. अशातच ‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेता विनीत कुमार सिंगने आपल्या लग्नाची बातमी देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. विनीतने इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करून विनीतने सांगितले की, त्याने त्याची गर्लफ्रेंड रुचिरासोबत सात फेरे घेतले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, विनीतने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. त्याचबरोबर रुचिराने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. फोटो शेअर करत विनीतने लिहिले की, ‘मी तुझा हात धरून इथपर्यंत आलो आहे. मी भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद.” (vineet kumar singh marries girlfriend in private ceremony share his wedding photos)

तब्बल ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी नागपुरमध्ये लग्न केले. आपल्या लग्नाबद्दल बोलताना विनीतने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “आम्ही कुटुंब आणि जवळच्या मित्रांमध्ये लग्न केले. लग्नासाठी आम्ही दोघांनी खूप प्लॅनिंग केले होते. आमच्या लग्नात महाराष्ट्रीय आणि उत्तर भारतीय अशा दोन्ही प्रथा पाळल्या गेल्या.”

विनीत पुढे म्हणाला, “रुचिरा ही देखील एक अभिनेत्री आहे आणि आम्ही आधीच स्पष्ट केले होते की, आम्ही आमचे वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवू, मात्र आम्ही एकत्रच होतो. आम्ही एकत्र खूप काही पाहिले आहे. प्रत्येक प्रसंगात ती माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. आता आम्ही आमचे नवीन आयुष्य सुरू केले आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत.”

विनीतने आतापर्यंत ज्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्या सर्वच चित्रपटांना पसंती मिळाली आहे. अभिनेत्याने ‘गँग्स ऑफ वासेपूर,’ ‘मुक्काबाज,’ ‘बेताल’ आणि ‘बार्ड ऑफ ब्लड’ या चित्रपटात आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

हे देखील वाचा