Tuesday, June 25, 2024

‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या ‘दिलबर’ गाण्याने नोरा फतेहीने २०१८ साली यूट्यूबर धमाल केली होती. या गाण्यानंतर नोरा इतकी प्रसिद्ध झाली की, आजही प्रेक्षकांवरील तिची जादू कायम आहे. या गाण्यानंतर जणू नोराचे भाग्यच चमकले!

एकामागून एक डान्स आयटम नंबर करून केवळ हिंदीच नव्हे, तर दक्षिण भारतीय चित्रपटांची आयटम नंबर वन बनलेली नोरा फतेही लवकरच आंतरराष्ट्रीय मंचावर डान्स करताना दिसणार आहे. ती इंटरनॅशनल सेन्सेशन निक जोनास आणि केहलानी सोबत जलवा करताना दिसणार आहे. (nora fatehi will perform with priyanka chopra husband nick jonas and kehlani at international event in abu dhabi)

नोरा फतेही, जिने आतापर्यंत अनेक आयकॉनिक स्पेशल नंबरवर परफॉर्म केले आहे, ती अबू धाबी येथे होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात, तिच्या काही लोकप्रिय गाण्यावर मुव्ह्ज दाखवताना दिसेल. तसे तर तिने परफॉर्म केलेली सर्व गाणी एकापेक्षा एक अशी आहेत, ज्यांना त्यांच्या खास स्टाईलने आणखी खास बनवले आहे. अलीकडेच नोराला ‘सत्यमेव जयते २’ मधील ‘कुसु कुसू’ गाण्यासाठी यूट्यूबवर प्रचंड प्रेम मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेहीने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉलिवूडचे प्रतिनिधित्व केले आहे. नोराने पॅरिसमधील L’Olympia Bruno Coquetrix येथे अरबी आणि भारतीय नृत्य आणि गायन सादर केले. नोरा फतेही असा दावा करते की, ती चित्रपटसृष्टीतील एकमेव सेलिब्रिटी आहे, जिने प्रतिष्ठित ठिकाणी ऑलिम्पियामध्ये आपला परफॉर्मन्स दिला.

नोरा या वर्षी ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ आणि जॉन अब्राहम अभिनित ‘सत्यमेव जयते २’ या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली. तर ३ डिसेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नोराने हार्डी संधूसोबतही अनेक डान्स नंबरची रिहर्सल केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री

-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती

हे देखील वाचा