Monday, July 1, 2024

बोल्डनेसचा कहर! कविता कौशिकने बिकिनी परिधान करून समुद्रात लावली आग; यापूर्वी पाहिला नसेल ‘असा’ अंदाज

छोट्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अभिनयासोबतच आपल्या बोल्डनेससाठीही ओळखल्या जातात. त्या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो कविता कौशिक या अभिनेत्रीचा. कविता मालिकांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. ती दरदिवशी आपल्या चाहत्यांसोबत कोणता ना कोणती पोस्ट शेअर करत असते. नुकतेच ती आपल्या अशाच एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये कविताने बिकिनी परिधान करून समुद्रात आग लावत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कविताचा तो बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे, जो कदाचित तिच्या चाहत्यांनी कधीही पाहिला नाही.

व्हिडिओ होतोय व्हायरल
कविताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती सुट्ट्यांची मजा घेताना दिसत आहे. ती आधी एका खोलीत झोपून बाहेरचे दृश्याचा आनंद घेताना दिसत आहे. त्यानंतर ती उठून समुद्रकिनारी जाते. यादरम्यान तिने पिवळ्या आणि काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. या व्हिडिओत कविता खूपच बोल्ड दिसत आहे. प्रत्येक जण तिच्या या बोल्डनेसवर फिदा झाला आहे. तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Actress Kavita Kaushik Shares Bold Video In Bikini During Vacation Viral On Social Media)

नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव
कविताने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “कारण आज रविवार आहे.” तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज आणि २९ हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटकरी जोरदार कमेंट्स करत आहेत. यासोबतच कलाकारही स्वत:ला तिच्या या व्हिडिओवर कमेंट्स करण्यापासून रोखू शकत नाहीत. राखी सावंतने कमेंट करत कविताला हॉट म्हटले. दुसरीकडे कॉमेडियन गौरव गेराही तिच्या बोल्डनेसवर फिदा होताना दिसला.

अभिनेत्रीने टीव्ही वरील मालिकांमधून आपली एक वेगळी ओळख बनवलेली आहे. साल २००१ मध्ये आलेली मालिका ‘कुटुंब’मधून तिने अभिनयामध्ये पदार्पण केले. परंतु विनोदी कार्यक्रम ‘एफआयआर’ने तिला घराघरात पोहचवले. यामध्ये तिने तब्बल १० वर्ष काम केले. टीव्ही शोमधील सर्वात बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. सध्या ती ‘लक्ष्मी घर आई’मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कमीत कमी मुलाला तरी सोडा’, म्हणत अबरामच्या मागे लागलेल्या फोटोग्राफर्सवर संतापले चाहते

-मस्तच! सबाने शेअर केला शर्मिला अन् मन्सूर अली यांच्या साखरपुड्याचा फोटो, चाहते म्हणाले…

-काय सांगता! ‘द फ्लॅश’मध्ये पाहायला मिळणार दोन व्हर्जन; इझरा मिलरचा ‘डीसी फँडम’मध्ये खुलासा

हे देखील वाचा