Thursday, March 28, 2024

‘कमीत कमी मुलाला तरी सोडा’, म्हणत अबरामच्या मागे लागलेल्या फोटोग्राफर्सवर संतापले चाहते

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अं’मली पदार्थ प्रकरणात अडकला आहे. तुरुंगात असलेल्या आर्यन खानचे संपूर्ण कुटुंब संकटातून जात आहे. दरम्यान, आर्यन खानचा धाकटा भाऊ अबरामचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. पॅपराजींनी अबरामचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, ज्यात तो कारच्या आत बसलेला दिसत आहे.

अबराम कॅमेऱ्यात झाला कैद
वांद्रा येथे रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ पाहून अबरामचे चाहते आणि इतरांनी पॅपराजींना जोरदार ट्रोल केले आहे. व्हायरल भयानीने हा व्हिडिओ शेअर केला आहे, पण कमेंट बॉक्समध्ये चाहते फक्त फोटोग्राफर्सची शाळा घेताना दिसले. एका नेटकऱ्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, “मुलाला सोडा.”

कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांची आगपाखड
त्याचप्रमाणे दुसऱ्या एकाने लिहिले की, ”किमान त्या मुलाला एकटे सोडा.” आणखी एकाने लिहिले की, “कमीत कमी मुलाला तरी सोडा.” तसेच दुसऱ्या एकाने लिहिले की, “मुलाला सोडा, तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, तो आरामात नाहीये.” आर्यन खानला एका रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अं’मली पदार्थ खरेदी केल्याचा आरोप आहे.

शाहरुख खानने सोडले शूटिंग
आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सोडून थेट भारतात आला आहे. तेव्हापासून तो प्रयत्न करत आहे, पण आर्यनला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. आर्यन खानची पुढील सुनावणी मंगळवारी असून, आता त्याला न्यायालयाकडून दिलासा मिळतो की, नाही हे पाहावे लागेल.

आर्यन २० ऑक्टोबरपर्यंत असेल तुरुंगात
क्रूझ अं’मली पदार्थ पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या जामीन अर्जावर गुरुवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत निकाल रोखून ठेवला आहे. आर्यन खानच्या वतीने अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे, तर एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांनी युक्तिवाद सादर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मस्तच! सबाने शेअर केला शर्मिला अन् मन्सूर अली यांच्या साखरपुड्याचा फोटो, चाहते म्हणाले…

-काय सांगता! ‘द फ्लॅश’मध्ये पाहायला मिळणार दोन व्हर्जन; इझरा मिलरचा ‘डीसी फँडम’मध्ये खुलासा

-पत्नीची प्रेग्नेंसी नाही, तर ‘हे’ आहे शो बंद करण्यामागचं खरं कारण; कपिल शर्माचा मोठा खुलासा

हे देखील वाचा