Sunday, June 1, 2025
Home अन्य भिमा कोरेगावबद्दल केतकी चितळेचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाली, ‘सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली?’

भिमा कोरेगावबद्दल केतकी चितळेचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाली, ‘सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली?’

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे ही सतत आपल्या अभिनयामुळे परखड वक्तव्यामुळे ओळखली जाते. तिने मराठी मालिका आणि कार्यक्रमांमधये काम केले आहे. केतकीला अनेकदा तिच्या परखड वक्तव्यामुळे ट्रोलिंगचा सामना काराव लागतो. मात्र, तरिही ती आपले मत मांडतच असते. केतकीने पुन्हा सोशल मीडियावर अशी पोस्ट शेअर केली ज्यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या घेऱ्यात अडकली आहे. 

‘आंबट गोड’ या प्रसिद्ध मालिकेतून केतकी चितळे (Ketaki Chitale) घराघरात पोहोचली. यानंतर तिने अनेक कार्यक्रमामध्ये काम केले असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने समाजात घडणाऱ्या घडामोडी असो किंवा राजकारण सतत आपल्या वादग्रस वक्तव्यामुळे केतकी वादाच्या घेऱ्या अडकत असते. त्याशिवाय तिने
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही वाद निर्माण होईल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तिला तुरुंगवासही सोसावा लागला होता. मात्र तरिही ती आपले मत मांडतच असते.

केतकीच्या एका व्हिडिओवर नेटऱ्याने कमेंट करत लिहिले होते की, “तमाम भारतीयांना भिमा कोरेगाव शौर्य दिनाच्या शुभेच्छा द्याल असे वाटले होते. आजचा दिवस दुर्लक्षित होणे अनपेक्षित आहे.”

 

View this post on Instagram

 

यावर कमेंट करत केतकी भडकली आणि तिने कमेंट करणाऱ्यावर खोचक पद्धतीने प्रतिउत्तर देत लिहिले की, “भिमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली?! ब्रिटिश सरकारच्या बाजूने मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी राष्ट्रद्रोही (धर्मद्रोही) वाटते, किंवा तुम्हाला खरा इतिहास माहिती नाही. यातील नेमकं काय?”

ketaki chitale

केतकीच्या अशा कमेंटनंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचे सुरु केले आहे. त्याशिवाय असे दिसून येत आहे की, केतकीलाच खरा इतिहास माहिती नाही. त्याशिवया तिने अनेक चाहत्यांच्या भावना देखिल दुखावल्या आहेत. आता केतकीचा हा वाद कुठे जाऊन संपणार आहे हे पाहाणे खूपच महत्वाचं ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
२०२२ सालाला निरोप देताना अभिनेत्री हेमांगी कवीने शेअर केली सालाचा मागोवा घेणारी पोस्ट
बेशरम रंग गाण्यावर थिरकली ‘विंक गर्ल नॅशनल क्रश’, पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा