Thursday, November 30, 2023

‘स्वत:ला बदलण्याची वेळ आहे’! अमृता फडणवीस यांच्या विधानावर केतकी चितळेची टीका

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या दमदार अभिनयासोबतच आपल्या बिंधास्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. समाजात होणाऱ्या घडामोडी असो वा राजकारण यातील कोणत्याही मुद्द्यांवर केतकी नेहमीच आपले परखड प्रतिक्रिया देत असते. नुकंतच एका मुलाखतीदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर केतकीने टीका केली आहे.

मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale)  ही सतत आपल्या वदग्रस्त वक्तव्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये केतकीला नेहमीच आपल्या बिंदास्त वक्तव्यामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र, तरिही केतकी आपले मत व्यक्त करण्यास घाबरत नाही. तिने पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फणविस यांची पत्नी अमृता फडणविस (Amruta Fadanvis) यांच्याशी भिडली आहे. (Ketaki Chitale comment on Amruta Fadanvis releted)

नुकतंच अमृता फडणवीस यांनी एका कर्यक्रमादरम्यान त्यांनी देशाचे राष्ट्रपिता माहात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विषयी एक विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. जुन्या भारताचे माहात्मा गांधी, तर नवीन भारताचे नरेंद्र मोदी राष्ट्रपिता आहेत. अमृताजिंनी केलेलं हे विधान सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं असून नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाना साधत ट्रोल केलं जातंय. नुकतंच याच्यावर अभिनेत्री केतकी चितळे हिने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ketaki chitale
Photo Courtesy: Instagram/epilepsy_warrior_queen

केतकीने पोस्ट शेअर करत लिहिले की, “नवीन राष्ट्रपिता आता हा वाद जुना होत आहे. भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलत आहे आणि आणि आता आपण स्वत:लाही बदलण्याची वेळ आली आहे. आता तीन हजार प्राचीन गोष्टींची व्याख्या 100 वर्षाची झाली आहे. आणि हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे.” असं म्हणत केतकीने नाव न घेता ही पोस्ट अमृताजिंनी केलेल्या विधानावर टीका करत केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिमानास्पद! RRR चित्रपटातील ‘नातु नातु’ गाणं ऑस्करसाठी झालं शॉर्टलिस्ट

‘पठाण चित्रपटामधील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहिल का व्हिडिओ?

हे देखील वाचा