Saturday, June 15, 2024

“जेव्हा कागद पेन नसते, तेव्हा काही…” अभिनेत्री केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय विवादित अभिनेत्री म्हणून केतकी चितळेला ओळखले जाते. अनेक मराठी मालिकांमध्ये काम करत केतकीने तिची अभिनेत्री म्हणून ओळख कामवाली. मात्र यासोबतच अनेक मोठ्या वादांमुळे तिला विवादित अभिनेत्री अशी नवीन ओळख मिळाली. शरद पवारांवर केलेल्या एका कवितेमुळे तिला जेलची हवा देखील खावी लागली होती. सध्या अभिनयापासून लांब असलेली केतकी सोशल मीडियावर मात्र सक्रिय दिसते. अनेकदा ती विविध पोस्ट शेअर करत तिच्या उपस्थितीची जाणीव करून देते.

नुकतीच अर्थात २८ मे रोजी स्वातंत्रवीर सावरकर यांची जयंती साजरी झाली. या निमित्ताने अनेकांनी वीर सावरकरांच्या आठवणींना उजाळा दिला, तर सगळ्यांनीच त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अशातच केतकी चितळेने देखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून तिने सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आहे. सध्या तिची पोस्ट कमालीची व्हायरल झाली आहे.

केतकीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “जेव्हा कागद पेन नसते, तेव्हा काही रचणे ही कल्पना मला गेल्या वर्षांपर्यंत झेपत नव्हती. पाठांतराने हे शक्य आहे हे कळायचे, पण कधी गरजच पडली नव्हती.

गेल्यावर्षी जेव्हा मला तुरुंगात टाकण्यात आले, तेव्हा फक्त सावरकरांना डोळ्यासमोर ठेवून रोज पाठांतर करीत वही-पेन मिळेपर्यंत बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या. त्यांच्याकडून ही गोष्ट ही शिकायला मिळेल हे कधीच वाटले नव्हते”, असे केतकी चितळेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले आहे.

दरम्यान केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यावर अनेकांनी तिला सुनावले आणि तिच्यावर तक्रार दखल झाली. पुढे केतकीला अटक झाली आणि ती तब्बल ४१ दिवस तुरुंगात होती. तिच्या तुरुंगातील दिवसांबद्दल तिने आज सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने तिची आठवण शेअर केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘वेड’ चित्रपटाने आयफा 2023मध्ये मारली बाजी; ‘या’ विषेश पुरस्काराने अभिनेता सन्मानित
‘या’ सुपरस्टारला करायची होती ‘जंजीर’मध्ये भूमिका, अनेक कलाकारांनी नकार दिल्यावर अशी झाली सिनेमात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री

हे देखील वाचा