Wednesday, June 26, 2024

‘मला रामायण आणि महाभारत पाहण्याची परवानगी नव्हती’, अभिनेत्रीसोबत असं का वागायची आई? स्वत:च केला खुलासा

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत रामायण आणि महाभारत या महाकाव्यांवर आधारित अनेक मालिका तसेच सिनेमे आले आहेत. या महाकाव्यांसाठी अनेकांच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले आहे की, तिची आई अपर्णा सेन यांनी तिला कधीच रामायण आणि महाभारत टीव्हीवर पाहू दिले नाही. यासोबतच तिने सांगितले की, अमेरिकन मालिका ओपेरा पाहण्याचीही परवानगी तिला नव्हती. चला तर, यामागील कारण जाणून घेऊयात…

अलीकडेच, ‘फिल्म कंपेनियन’शी बोलताना कोंकणा सेन शर्मा (Konkana Sen Sharma) हिने मोठा खुलासा केला. तिने म्हटले की, तिच्या आईने म्हणजेच अपर्णा सेन (Aparna Sen) यांनी कधीच तिला रामायण आणि महाभारत पाहू दिले नाही. कोंकणा सेन शर्मा रामायण आणि महाभारत (Konkana Sen Sharma Ramayana And Mahabharata) न पाहू देण्याविषयी सांगते की, “मला रामायण आणि महाभारत पाहण्याची परवानगी नव्हती. मी आधी महाकाव्य वाचावे आणि त्यानंतर त्यांना पाहावे, असे सांगण्यात आले होते.” पुढे ती असेही म्हणाली की, “या महाकाव्यांना पहिल्यांदा पाहणे कुणाचीही कल्पना नसली पाहिजे. ही तुझी स्वत:ची कल्पना असली पाहिजे.”

रामायण पाहण्याची परवानगी नव्हती
दुसरीकडे, कोंकणाने हेही सांगितले की, तिच्या आईने तिला कधीच हिंदी आणि बंगाली सिनेमे पाहण्याचीही परवानगी दिली नाही. तसेच, तिला खूप जास्त वेगवेगळे सिनेमे पाहण्याची संधी मिळाली. अभिनेत्री म्हणाली की, “याव्यतिरिक्त मला द बोल्ड अँड ब्युटीफुल सांता बारबरा यांसारख्या अमेरिकन मालिकाही पाहण्याची परवानगी नव्हती.”

अशी वागणूक द्यायची आई
कोंकणाने आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट सांगितली. जेव्हा ती लहान होती, तेव्हाही तिची आई तिच्यासोबत एका अडल्टसारखी वागणूक द्यायची. ती म्हणाली की, “मी तर फक्त मुलगी होते. तरीही ज्याप्रकारे त्यांनी माझे पालन-पोषण केले, मला नेहमी स्वत:ची एक जागा दिली गेली. त्यामुळे मला वाटते की, यामधून मला खूप मदत मिळाली.”

कोंकणाविषयी बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत अनेक सिनेमात काम केले आहे. ती एक चित्रपट निर्मातीही आहे. कोंकणाने ‘वेकअप सिड’, ‘लस्ट स्टोरीज 2’, ‘कुत्ते’, ‘एक थी डायन’ यांसारख्या सिनेमातही काम केले आहे. (actress konkona sen sharma mother stop her to watch ramayana mahabharat on tv know here)

महत्त्वाच्या बातम्या-
‘Gadar 2’च्या स्क्रीनिंगला सावत्र बहिणीसोबत दिसले सनी आणि बॉबी; चाहता म्हणाला, ‘ही बाँडिंग फक्त प्रमोशनसाठी’
‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच जिया शंकर बनली आलिशान कारची मालकीण, स्वत:च्या हिंमतीवर खरेदी केली महागडी कार

हे देखील वाचा