Thursday, September 28, 2023

‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच जिया शंकर बनली आलिशान कारची मालकीण, स्वत:च्या हिंमतीवर खरेदी केली महागडी कार

बिग बॉस ओटीटी 2‘ या प्रसिद्ध पण तितक्याच वादग्रस्त शोचा फिनाले जवळ आला आहे. या शोला नवीन विजेता मिळणार आहे. मात्र, टॉप 5च्या शर्यतीतून बाहेर पडलेली स्पर्धक आणि अभिनेत्री जिया शंकर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जिया सातत्याने मुलाखती देत आहे. तसेच, लोकांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रियाही देत आहे. तिला शोमधून बाहेर पडून आठवडाही उलटला नाही की, तोच अभिनेत्री आता तिच्या आलिशान कार खरेदीमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा यादरम्यानचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये ती नारळ फोडत आहे, तर तिची आई आरती करताना दिसत आहे.

जिया शंकर बीएमडब्ल्यू एक्स1 कारची मालकीण
अभिनेत्री जिया शंकर (Jiya Shankar) हिने स्वत:लाच एक लग्झरी कार गिफ्ट केली आहे. जिया शंकर बीएमडब्ल्यू एक्स1 (Jiya Shanka BMW XI) कारची मालकीण बनली आहे. तिने बीएमडब्ल्यू एक्स1 (BMW XI) कारचा नवीन मॉडेल खरेदी केला आहे. यादरम्यानचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओत ती ‘हर हर महादेव’ म्हणत नारळ फोडताना दिसत आहे. त्यानंतर तिची आई फुलांनी सजलेल्या आरतीचे ताट घेऊन येते आणि बोनटवर हार लावून आरती करते. तसेच, पूजानंतर पॅपराजींचेही तोंड गोड करते. खरं तर, या आलिशान कारची किंमत जवळपास 40 ते 60 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

युजर्सच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तू स्वत: तुझ्या कमाईतून कार खरेदी केली, जी अभिमानाची बाब आहे. तुला यासाठी कोणाचीही गरज नाही. तू वास्तवात स्टार आहेस.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “हिला आपली स्वप्न पूर्ण करण्यासीठी कोणत्याही पुरुषाची गरज नाहीये.” आणखी एकाने लिहिले की, “आत्मनिर्भर आणि स्वत:च्या हिंमतीवर इथपर्यंत पोहोचणारी मुलगी. खूप अभिमान आहे.”

अभिनेत्री जिया शंकर बिग बॉस ओटीटी 2 (Jiya Shankar Bigg Boss OTT 2) ही शोमध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेचा विषय ठरत होती. तिला यादरम्यान अनेक नावांचे टॅग देण्यात आले होते. कुणी तिला भटकणारी आत्मा, तर कुणी नागीन म्हटलं होतं. अशात ती जेव्हा घराबाहेर पडली, तेव्हा तिला टॉप 5मध्ये न पोहोचण्याची खंत होती. मात्र, तिला या गोष्टीचा आनंद होता की, ती तिच्या चाहत्यांमुळे एवढा मोठा प्रवास करू शकली. (actress jiya shankar gifted herseld luxury car bmw x1 see video here)

महत्त्वाच्या बातम्या-
ही दोस्ती तुटायची नाय! जुन्या मित्रासाठी नाना पाटेकरांची ‘Gadar 2’च्या स्क्रीनिंगला हजेरी, पाहा मित्रप्रेम
Box Collection Day 2 : ‘Gadar 2’ने अवघ्या दोनच दिवसात हालवून टाकलं बॉक्स ऑफिस, ‘OMG 2’नेही घेतली भरारी

हे देखील वाचा