बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननच्या सरोगसी आणि प्रेग्नंसीवर आधारित बहुप्रतिक्षित ‘मिमी’ चित्रपटाचा ट्रेलर १३ जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटासाठीची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या चित्रपटात क्रिती पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. सुरुवातीपासूनच या चित्रपटातील क्रितीचा लूक भलताच चर्चेत होता. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओही प्रदर्शित केला आहे.
नेटफ्लिक्सकडून प्रदर्शित केलेल्या या मेकिंंग व्हिडिओत क्रितीचा प्रवास दाखवला आहे की, कशाप्रकारे अभिनेत्रीने स्वत:चा फिट फिगर बदलला आणि जवळपास १५ किलो वजन वाढवले. व्हिडिओच्या सुरुवातीला चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणतात की, “जर मिमीला लोकांशी कनेक्ट करायचे असेल, तर तिला १५ किलो वजन वाढवावे लागेल.”
त्यानंतर सेटवर सर्वजण क्रितीच्या खानपानावर लक्ष देतात. या व्हिडिओत ती प्रत्येक वेळी चॉकलेट, बर्गर आणि बरंच काही खाताना दिसत आहे. शेवटी क्रिती म्हणते की, तिने ते सर्व खाल्ले आहे, ज्यासाठी तिला मनाई करण्यात आली होती. चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. (Actress Kriti Sanon Film Mimi Making Video Release On Netfilx)
नुकत्याच प्रदर्शित झालेला चित्रपटाचा ट्रेलर पाहून समजते की, क्रिती सेनन एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीची भूमिका साकारत आहे. तसेच ती पैशांसाठी एका परदेशी जोडप्याच्या मुलाची सरोगेट आई बनण्यासाठी तयार होते. यानंतर ते जोडपे आपला निर्णय बदलतात. पुढे ते सांगतात की, त्यांना हे मूल नाही पाहिजे. त्यानंतर मिमीला खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो.
ट्रेलरमध्ये पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि क्रिती सेनन यांसारख्या सर्व कलाकारांचा दमदार अंदाज प्रत्येकाचे मन जिंकेल. क्रिती आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अशी भूमिका साकारताना दिसत आहे, जी खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे.
चित्रपट येत्या ३० जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहून असे दिसते की, ते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-