Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘आमचा भेडिया जंगली झालाय, हे प्रेमही नाहीये आणि…’, सुपरस्टार प्रभाससोबत डेटिंगवर अभिनेत्रीचे भाष्य

‘आमचा भेडिया जंगली झालाय, हे प्रेमही नाहीये आणि…’, सुपरस्टार प्रभाससोबत डेटिंगवर अभिनेत्रीचे भाष्य

हिरोपंती‘ हा सिनेमा आठवतो का? या सिनेमातून अभिनेत्री क्रिती सेनन हिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. 2014 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमानंतर क्रिती चाहत्यांची आवडती अभिनेत्री बनली होती. यानंतर क्रितीने अनेक हिट सिनेमे दिले. यामध्ये तिने वेगवेगळ्या सुपरस्टार्ससोबत काम केले. अशात तिचे नाव एका सुपरस्टारसोबत जोडले जात आहे. तो इतर कुणी नसून प्रभास आहे. अशा चर्चा आहेत की, ‘आदिपुरुष‘ सिनेमातील सहकलाकार प्रभासला क्रिती गुपचूप डेट करत आहे. नुकतेच वरुण धवन यानेही क्रितीला प्रभाससोबतच्या नात्यावरून चिडवले होते. या सर्वांमध्ये आता अभिनेत्रीने डेटिंगच्या या अफवांना एकदाचा पूर्णविराम लावला आहे.

क्रितीने दिले स्पष्टीकरण
अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर डेटिंगविषयीच्या चर्चांबद्दल स्पष्टीकरण दिले. तिने स्पष्ट करत म्हटले की, एका रियॅलिटी शोमध्ये वरुणच्या चेष्टेने मर्यादा पार केली होती. त्यावरून लोकांनी प्रभाससोबत ती सिक्रेट रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज बांधला होता. ती म्हणाली की, वरुणच्या मजेशीर चेष्टेने नवीन अफवांना जन्म दिला. मात्र, या सर्व अफवा आधारहीन आणि खोट्या आहेत.

क्रितीची इंस्टा स्टोरी
क्रितीने इंस्टा स्टोरीवर शेअर करत नोटमध्ये लिहिले की, “हे प्रेमही नाहीये आणि पीआरही नाहीये. आमचा भेडिया एका  रियॅलिटी शोमध्ये जरा जास्तच जंगली झाला आहे. त्याने मजेशीर चेष्टेने काही ओरडणाऱ्या अफवांना जन्म दिला आहे. यापूर्वीही कोणत्यातरी पोर्टलने माझ्या लग्नाची तारीख जाहीर केली होती. मला तुमचा फुगा फोडू द्या. अफवा आधारहीन आहेत.”

Kriti-Sanon
Photo Courtesy Instagramkritisanon

आदिपुरुषच्या टीझर लाँचवर प्रभास- क्रितीची केमिस्ट्री
खरं तर, ‘आदिपुरुष’च्या टीझर लाँचवर प्रभास आणि क्रिती सेनन (Prabhas And Kriti Sanon) यांच्यात एक केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. दोघांनीही स्टेजवर हातात हात घालून एकमेकांची गळाभेट घेत संवाद साधला होता. इतकेच नाही, तर ते एकमेकांशी बोलताना हसताना आणि लाजतानाही दिसले होते. क्रितीने प्रभासला घाम पुसण्यासाठी आपली ओढणीही दिली होती. (actress kriti sanon said dating with prabhas rumor is baseless)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘लोकं आमच्या इंडस्ट्रीची चेष्टा करायचे’, साऊथ सिनेमांविषयी ‘भल्लाळदेव’ स्पष्टच बोलला
चेतन भगत राहिले बाजूला आता ‘या’ अभिनेत्रीने घेतला उर्फीशी पंगा; म्हणाली, ‘चिखलात दगड मारल्यावर…’

हे देखील वाचा