Friday, February 3, 2023

वयाच्या 42 व्या वर्षीही अविवाहित आहे प्रभास; अभिनेत्यामुळे थांबले होते अनुष्काचे लग्न, वाचा ‘तो’ किस्सा

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटात झळकून नावारूपाला आलेला अभिनेता म्हणजे प्रभास होय. त्याने या आधी अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे, परंतु त्याच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने त्याला जगभर ओळख निर्माण करून दिली आहे. प्रभास शनिवारी (23ऑक्टोबर) त्याचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात तिने ‘देवसेना’, तर प्रभासने ‘बाहुबली’ ही पात्र निभावली होती. चित्रपटात दोघांची केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडली होती. मात्र, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील ही गोष्ट अनेकांना माहीत देखील नसेल की, प्रभासने अनुष्काचे लग्न होण्यापासून थांबवले होते. या मागील कारण ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला तर जाणून घेऊया तो किस्सा…

प्रभास आणि अनुष्का यांच्याबाबत मागच्या वर्षी एक अशी बातमी आली होती की, प्रभासने त्याची कथित गर्लफ्रेंड अनुष्काचे लग्न तोडले होते. असे म्हणतात की, अनुष्का लग्न बंधनात अडकणार होती, परंतु प्रभाससाठी तिने तिचा निर्णय बदलला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, अनुष्काचे लग्न 2015 मध्ये झाले असते. ती त्या वेळेस ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती आणि त्याच वेळेस तिच्या लग्नाची जोरदार तयारी चालू झाली होती. मात्र, प्रभासला तिचा हा निर्णय अजिबात मान्य नव्हता. (Prabhas stopped anushka shetty a marriage during shooting of Bahubali)

त्यावेळी प्रभासने अनुष्काला सांगितले होते की, तिने आता ‘बाहुबली’ चित्रपटाच्या शूटिंगवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यावेळी तिने देखील त्याचे म्हणणे मान्य केले होते. तिने तिचे लग्न पाच वर्षे पुढे ढकलले. आज प्रभास भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याचबरोबर अनुष्काची जादू देखील कोणत्या मोठ्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये. तिच्या ‘देवसेना’ या बिनधास्त आणि धाडसी पात्राने तिला खूप वाहवा मिळाली आहे.

तिचे लग्न थांबल्यानंतर तिच्या आणि प्रभासच्या अफेअर्सच्या बातम्या खूप वेगाने व्हायरल होत होत्या. परंतु त्या दोघांनी अनेकवेळा ही गोष्ट माध्यमांना आणि त्यांच्या चाहत्यांना स्पष्ट सांगितली आहे की, ते दोघेही खूप चांगले मित्र आहेत. बाकी त्यांच्यात काहीच नाही आणि लग्न करण्याचा देखील त्यांनी कोणताच प्लॅन केला नाही.

सध्या दोन्ही कलाकार त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहे. सध्या त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही गोष्टी ऐकू येत नाहीत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-
प्रभासमुळे अनुष्का शेट्टीने ऐनवेळी दिला होता लग्नाला नकार, आजपर्यंत आहे अविवाहित

आलिया की रणबीर, कोणावर गेली मुलगी? आजी नीतू कपूर महणाल्या,’अजून बाळ…’

हे देखील वाचा