बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनने बॉलिवूडमध्ये आपले एक खास स्थान निर्माण केल आहे. अगदी कमी काळात क्रितीने हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘मिमी’ या चित्रपटात तिने एका सरोगेट आईची भूमिका साकारली होती. अनेकांनी तिचे या भूमिकेसाठी कौतुक केले आहे. सोशल मीडियावर क्रितीचे अनेक ग्लॅमरस फोटो व्हायरल होताना दिसतात. नुकतेच क्रितीने ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या शूट दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर राडा घालत आहेत.
चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना क्रितीने ओम राऊतसोबत दोन फोटो शेअर केले, ज्यात ती खूप आनंदी दिसत आहे. पहिल्या फोटोत ती ओमसोबत पोझ देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती फिल्ममेकरसोबत केक कापताना दिसत आहे. हे फोटो तिने ट्विटरवर शेअर केले आहे. फोटो शेअर करताना क्रितीने लिहिले की,“विश्वास बसत नाही की, हा प्रवास इतक्या लवकर संपला आहे. मला जानकी बनवण्यासाठी आणि विश्वास ठेवण्यासाठी की, मी ते ओझे आणि जबाबदारी हाताळू शकते. त्याबद्दल खूप आभार.”
Can’t believe this journey has come to an end so soon! ????
Thank you for giving me #Janaki and believing that i could carry the weight & responsibility that the character came with.Your vision is extraordinary! Its a film & a character I’ll always be proud of! #Adipurush ✨???????? https://t.co/zmIjK0oAiQ— Kriti Sanon (@kritisanon) October 16, 2021
तसेच तिने पुढे लिहिले की, “तुमचे विजयन खूप दूरगामी आहे. हा एक चित्रपट आणि एक असे चरित्र आहे, ज्याचा मला नेहमीच अभिमान असेल.” त्याचबरोबर चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत यांनीही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की,“प्रिय क्रिती, तुला जानकीचे पात्र साकारताना पाहून जादूच झाली आहे. विश्वास बसत नाही की, तु शुटिंग पुर्ण केले आहेस. हा किती सुंदर प्रवास आहे.”
दरम्यान, अभिनेता सैफ अली खानने ‘आदिपुरुष’ चित्रपटातील त्याच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. सैफ अली खान, बाहुबली अभिनेता प्रभास, क्रिती आणि सनी सिंग चित्रपटात पात्र साकारताना दिसणार आहेत. सैफ या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सुरुवातीला सैफचा या पात्रासाठी जोरदार विरोध झाला. मात्र, सैफचे चाहतेही या चित्रपटातील त्याचे पात्र पाहून खूप उत्सुक झाले आहेत. हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर आधारित आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
क्रितीविषयी बोलायचे झाले, तर तिने २०१४ मध्ये ‘हिरोपंती’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘बरेली की बर्फी’ , ‘दिलवाले’, ‘राबता’, ‘पानिपत’ अशा चित्रपटामध्ये झळकली आहे. लवकरच ती ‘आदिपुरुष’सह ‘हम दो हमारे दो’ चित्रपटात आपला दमदार अभिनय दाखवणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-दिशा पटानीच्या बॉयफ्रेंडवर आहे क्रिती सेननची नजर? अभिनेत्रीने सर्वांसमोर जाहीर केली ‘ही’ इच्छा