Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री कुशा कपिलाने केली घटस्फोटाची घोषणा; म्हणाली, ‘हे नात टिकवण्यासाठी ..’

यूट्यूबपासून सोशल मीडियापर्यंत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री कुशा कपिला होय. तिने अभिनयाच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या व्हिडिओंपासून तिच्या क्रिएटिव्ह कंटेंटपर्यंत ती अनेकदा लोकांमध्ये चर्चेचा विषय असते. परंतु आज कुशा कपिला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कुशा कपिलाच्या वैयक्तिक आयुष्यात खळबळ उडाली आहे.

कुशा कपिला (Kusha Kapila) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने खाजगी आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. कुशा कपिलाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन पती जोरावर पासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर कुशा कपिला विषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

कुशा कपिला आणि जोरावर या दोघांनी 2017 मध्ये लग्न केले होते. आता लग्नाच्या सहा वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. कुशा कपिलाने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “जोरावर आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हा कोणत्याही प्रकारे सोपा निर्णय नव्हता, परंतु आम्हाला माहित आहे की आमच्या आयुष्यातील या टप्प्यावर हा योग्य निर्णय आहे. आम्ही एकत्र वाटून घेतलेले प्रेम आणि जीवन हे इथेच थांबत आहे. दुर्दैवाने सध्या आम्हाला स्वतःसाठी जे हवे आहे ते घडत नाही. आम्ही ते करू शकलो नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kusha Kapila (@kushakapila)

कुशा पुढे म्हणाली की, “नात्याचा अंत हा हृदयद्रावक असतो. सध्याची परिस्थिती आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबियांसाठी कठीण परीक्षा आहे. सुदैवाने, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आमच्याकडे थोडा वेळ होता, परंतु आम्ही एकत्र घालवलेले क्षण कायम लक्षात राहतील. हे नातं टिकवण्यासाठी आम्हाला शक्य होत्या, त्या सर्व गोष्टी केल्या आहेत. आम्हाला आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी अजून खूप काही हवे आहे. यास बराच वेळ लागनार आहे. यावेळी आम्ही एकमेकांना प्रेम, आदर आणि पाठिंबा देत आहोत.” कुशा व जोरावर यांना एक गोंडस मुलगी देखील आहे. ते दोघे 2017ला विवाह बंधनात अडकले होते. (Actress Kusha Kapila has announced her divorce from husband Jorawar Singh Ahluwalia)

अधिक वाचा- 
Birthday | आरजेची नोकरी सोडून बनली यूट्यूबर, ‘असा’ मिळाला प्राजक्ता कोळीला बॉलिवूडमधील मोठा चित्रपट
‘हा सन्मान माझ्या रसिकांच्या प्रेमामुळेच…’, ज्येष्ठ नाट्यकर्मी आशाताई काळे यांना जीवनगौरव पुरस्कर प्रदान

हे देखील वाचा