बॉलिवूडमधील अनेक चित्रपट सध्या प्रदर्शित झाले आहेत. यातच अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित ‘बेल बॉटम’ हा चित्रपट गुरुवारी (१९ ऑगस्ट) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत. या चित्रपटात मिस युनिव्हर्स लारा दत्ता देखील दिसत आहे. यात तिचा लूक असा आहे की, तिला ओळखणेही अवघड आहे. याआधी लाराला अनेकवेळा आपण ग्लॅमरस अंदाजात पाहिले आहे. परंतु या चित्रपटात तिने भारताच्या माजी पंत्रप्रधान इंदिरा गांधी यांचे पात्र निभावले आहे. लाराला या रोलसाठी अक्षय कुमारने ऑफर दिली होती, तेव्हा ती हैराण झाली होती.
लाराने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिचे वडील एअरफोर्समध्ये विंग कंपाउंडर होते. एवढंच नाही तर तिचे वडील इंदिरा गांधींचे वैयक्तिक पायलट होते. त्यामुळे तिला हे पात्र निभावणे खूप सोप्पे झाले. यासोबत ही भूमिका निभावण्यासाठी मेकअप देखील महत्वाचा होता. लाराने सांगितले की, “मेकअप आणि प्रोस्थेटिक विक्रम गायकवाड यांनी केले होते. त्यांनी माझा चेहरा मोल्ड करून प्रोस्थेटिक बनवला होता. जेव्हा हे सगळं झालं, तेव्हा मी हैराण झाले होते. मी आरशात पाहून स्वतःला ओळखू शकत नव्हते.” (actress lara dutta father was a personal pilot of indira gandhi, actress says patriotism in my blood )
लाराने सांगितले की, इंदिरा गांधी यांच्यासारखे हावभाव करण्यासाठी तिला त्यांच्या अनेक मुलाखती बघायला लागल्या होत्या. लाराने सांगितले की, “पप्पा इंदिरा गांधी यांचे वैयक्तिक पायलट होते. त्यामुळे त्यांच्याबाबत अनेक गोष्टी मी लहानपणापासून ऐकल्या होत्या. पप्पांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींचा वापर झाला. एका फौजीची मुलगी असल्याने देशभक्ती माझ्या रक्तातच आहे. आम्ही नेहमी हेच शिकलो आहोत की, आपल्या मातृभूमीपेक्षा जास्त मोठं आणि महत्वाचं काही नाहीये. माझ्या पप्पांनी देशासाठी ३ युद्ध लढली आहेत. माझं हे काम करून मला खूप आनंद झाला आहे. आता प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.
लाराने सांगितले की, अक्षय कुमारने जेव्हा तिला या रोलबाबत विचारले तेव्हा ती खूप हैराण झाली होती. ती म्हणाली की, “मी अक्षयला म्हटले होते की, माझ्यात आणि इंदिरा गांधी आणि माझ्यात काहीच समानता नाहीये. परंतु त्याला माझ्यावर विश्वास होता.” बेल बॉटम या चित्रपटाला प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लईच भारी! उर्मिला कोठारेनं सुंदर फोटो केले शेअर; दिसतेय एकदम बिनधास्त