Tuesday, September 22, 2026
Home मराठी लईच भारी! उर्मिला कोठारेनं सुंदर फोटो केले शेअर; दिसतेय एकदम बिनधास्त

लईच भारी! उर्मिला कोठारेनं सुंदर फोटो केले शेअर; दिसतेय एकदम बिनधास्त

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि कमालीची डान्सर म्हणजे उर्मिला कोठारे होय. उर्मिला ही अभिनयासोबत उत्कृष्ट डान्स देखील करते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिच्या फोटोंना आणि व्हिडिओला तिचे चाहते देखील जोरदार प्रतिसाद देत असतात. तिचा बिनधास्त अंदाज सर्वांनाच खूप आवडतो. अशातच तिच्या चाहत्यांसाठी तिचा आणखी एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ती खूपच बिनधास्त आणि सुंदर दिसत आहे.

उर्मिलाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच ड्रेसला मॅचिंग अशी ज्वेलरी घातली आहे. तिच्या कर्ली हेअरमध्ये तिचे रूप आणखी खुलले आहे. तिच्या आजूबाजूला कुंड्यामध्ये झाडे दिसत आहे. यावरून कदाचित हे फोटोशूट तिने तिच्या घराच्या गच्चीवर केल्याचे समजते. तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोला आतापर्यंत या फोटोला १३ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. (marathi actress urmila kothare’s photo viral on social media)

अभिनेत्री उर्मिलाने अनेक मराठी चित्रपटात तसेच हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तिने मराठीमध्ये ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरू’, ‘काकण’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘मला आई व्हायचंय’, ‘वेलकम ओबामा’, ‘करार’, ‘टाईमपास २’, ‘खेळ मांडला’, ‘आई शपथ’, ‘टपाल’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘मायका’ आणि ‘मेरा ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

उर्मिलाचे लग्न मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याच्यासोबत झाले आहे. आदिनाथ देखील एक कमालीचा अभिनेता आहे. उर्मिला आणि आदिनाथने ‘दुभंग’, ‘अनवट’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. उर्मिला आणि आदिनाथ यांना एक मुलगी आहे. तिचे नाव जिजा असे आहे. उर्मिला नेहमीच तिच्या कुटुंबासोबत अनेकवेळा फोटो शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनाली कुलकर्णीने ‘बैरागी…बैरागी का सूती चोला…ओढ़के चली…’ म्हणत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

-अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला संपूर्ण कपूर कुटुंबाची हजेरी, कपूर सिस्टर्सने केली धमाल

-नलूच्या शालूमुळे मालिकेची पोलखोल, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या सीनमध्ये झाली मोठी चूक

हे देखील वाचा