Friday, April 4, 2025
Home बॉलीवूड केवळ नऊ वर्षांची असताना मधुबालाने केली होती अभिनयाला सुरुवात, या’ व्यक्तीने दिले होते मधुबाला नाव

केवळ नऊ वर्षांची असताना मधुबालाने केली होती अभिनयाला सुरुवात, या’ व्यक्तीने दिले होते मधुबाला नाव

आज (१४ फेब्रुवारी) रोजी संपूर्ण जग ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करत आहे. परंतु मनोरंजन क्षेत्रात आजची ही तारीख एका सौंदर्यवतीच्या नावावर आहे. जिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखोंना घायाळ केले होते. ती म्हणजे बॉलिवूडवर अनेक वर्ष राज्य करणारी अभिनेत्री मधुबाला. आज मधुबालाची जयंती आहे. अशातच तिच्या वाढदिवशी त्यांचे चाहते तिच्या आठवणीत तल्लीन झाले आहेत. 

मधुबाला (Madhubala) एक अशी अभिनेत्री होती जीची केवळ एक झलक पाहता तिच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर आपोआप स्माईल येत असायची. त्याकाळी तिला पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने गर्दी करत असत.‌‌ परंतु आजपर्यंत बॉलिवूडमध्ये तिचे सौंदर्य आणि तिला रिपेल्स करणारी अभिनेत्री आली नाही. आजही सौंदर्याचे दुसरे नाव म्हणून मधुबालाचा उल्लेख होतो.

Photo Courtesy Screengrab YoutubesHEMAROO

मधुबालाने ती केवळ ९ वर्षाची असताना काम करण्यास सुरुवात केली होती. कामाच्या शोधात मधुबालाचे वडील दिल्लीपासून मुंबईला गेले होते. स्टुडिओभोवती फिरता फिरता एक दिवस त्यांच्या ९ वर्षाच्या मुलीला ‘वसंत’ या चित्रपटात काम मिळाले. बॉम्बे टॉकीजची मालकीण देविका या मधुबालावर इंप्रेस झाल्या होत्या. त्यांनीच मुमताज जहा बेगम देहदवी हे नाव बदलून तिचे नाव मधुबाला हे ठेवले होते. ( Bollywood actress madhubala’ birth anniversary, let’s know about her)

मधुबालावर प्रेम करणारे अनेक लोक होते. परंतु त्या काळात तिला केवळ दिलीप कुमार आवडत होते. तिने स्वतः त्यांना फुले पाठवून त्यांच्यासमोर तिच्या प्रेमाचा खुलासा केला होता.

मधुबाला आणि दिलीप यांचे अनेक वर्ष प्रेम होते. परंतु तिच्या वडिलांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. त्यांना असे वाटत नव्हते की, त्यांच्या मुलीचे लग्न होऊ‌ नये. कारण तिच्याशिवाय घराचा खर्च भागवणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नव्हती.

मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे नाते, तर तुटले परंतु पुढे चित्रपटात काम करणारा दिलीप कुमार आणि मधुबाला यांना प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले. असे म्हटले जाते की, मधुबाला लग्नानंतर देखील दिलीप कुमार यांना विसरू शकली नाही.

मधुबालाच्या हृदयात छेद आल्याने तिची परिस्थिती खराब झाली. ‘मुगल-ए-आजम’ या चित्रपटात तिची डबल बॉडी वापरण्यात आली होती. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी केवळ ३६ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष

पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’

हे देखील वाचा