बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे मागच्या वर्षी निधन झाले आहे. पण त्यांनी शिकवलेला डान्स अजूनही प्रेक्षकांच्या मनात त्यांना जिवंत ठेवत आहे. सरोज खान यांनी अनेक अभिनेत्रींना डान्स शिकवला आहे. त्यांनी केवळ डान्स करायला शिकवले नाही, तर कॅमेऱ्यासमोर कसे हावभाव द्यायचे हे देखील शिकवले. याच गोष्टीची आठवण काढत अभिनेत्री माधुरी दीक्षित भावुक झाली होती. सरोज खान आणि माधुरी दीक्षित या दोघींमध्ये खूप चांगली बॉंडिंग होती. सरोज खान यांनी माधुरीची अनेक गाणी कोरिओग्राफ केली होती. त्यांनी तिचे शेवटचे कलंक चित्रपटातील तबाह हे गाणे कोरिओग्राफ केले होते. विशेष म्हणजे आज ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित आपला ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकतेच ‘डान्स दीवाने ३’ या रियॅलिटी शोच्या मंचावर सरोज खान यांची आठवण काढत माधुरी दीक्षित भावुक झाली. त्यावेळी तिने सरोज खान सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
या शो मधील होस्ट भारती सिंगने माधुरी दीक्षितला प्रश्न विचारला की,”सरोज खान कधी तुझ्यालर ओरडल्या होत्या का?” त्यावर माधुरीने उत्तर दिले, “हो, मला दिग्दर्शक खूप ओरडले होते त्यामुळे मी रडले होते. यावर त्या अजून ओरडल्या की, तू का रडत आहेस. आयुष्यात कधीच रडायचं नसतं. त्यांचं हे वाक्य मला खूप ताकद देतं. मला त्यांची आजही खूप आठवण येते.”
माधुरी दीक्षितने सांगितले की, तिने सरोज खान यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या. हावभाव, मूव्हमेंट्स, फिटनेस, कॅमेरा समोर कशाप्रकारे हावभाव द्यायचे. माधुरीने सांगितले की, “जेव्हा सरोज खान यांनी तिच्या करिअरला सुरुवात केली होती, तेव्हा त्यांनी स्वतःची ओळख बनवली होती. त्यावेळी सगळे पुरुष कोरिओग्राफर होते. त्यांनी स्वतःला मास्टरजीच्या रुपात सिद्ध केले. त्यांचा हा प्रवास मला खूप आवडतो.”
‘डान्स दीवाने ३’ या रियॅलिटी शोमधील दोन स्पर्धक पल्लवी आणि सिजा यांनी कलंक चित्रपटातील तबाह या गाण्यावर डान्स करून तो डान्स परफॉर्मन्स त्यांनी सरोज खान यांना समर्पित केला होता. सरोज खान यांनी या गाण्याला कोरिओग्राफ केले होते. त्यासाठी त्यांना बेस्ट कोरिओग्राफरचा पुरस्कार देखील मिळाला होता. माधुरी दीक्षितने या गाण्यावर परफॉर्मन्स केला होता.
सरोज खान यांनी माधुरी दीक्षितला ‘एक दोन तीन’, तम्मा, तम्मा’, ‘डोला रे डोला’, ‘धक धक करने लगा’ या गाण्यांवर डान्स शिकवला आहे. ही सगळी गाणी खूप सुपरहिट होती. मागच्या वर्षी सरोज खान यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्याचा मृत्यू झाला. सगळेजण त्यांना मास्टरजी या नावाने हाक मारत असत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या गरीब मुलासोबत काय करतेय?’ बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल