Friday, April 26, 2024

प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला ‘या’ कारणामुळे करायचे नव्हते ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितसोबत काम

बॉलिवूड अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री ही 80 ते 90 च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री होती. तिने अनेक चित्रपटात दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. शास्त्रीय नृत्यामध्ये तरबेज असणारी मीनाक्षी जेव्हा डान्स करायची, तेव्हा सगळे तिला पाहतच राहायचे. या सौंदर्यवतीने बॉलिवूडमध्ये ‘दामिनी’, ‘घायल’, ‘घातक’, ‘हिरो’ यांसारखे अनेक चित्रपट केले आहेत. त्यावेळी ती एक टॉप अभिनेत्री होती.

चित्रपट दिग्दर्शक टिनू आनंद यांचा ‘शहंशाह’ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांना शहंशाह या नावाने ओळख मिळाली. सन 1988 मध्ये आलेल्या या सुपरहिट चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत मीनाक्षी (meenakshi seshadri) यांनी काम केले होते. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर टिनू आनंद अजtन एक चित्रपट बनवण्याच्या तयारीला लागले होते, तो चित्रपट म्हणजे ‘शिनाख्त’.

या चित्रपटासाठी आनंद अमिताभ बच्चन यांच्यासोबत डिंपल कपाडिया यांना घेऊ इच्छित होते. परंतु कमी फी असल्याने डिंपल यांनी हा चित्रपट नाकारला. यानंतर त्यांनी या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षित आणि मीनाक्षी शेषाद्री यांना साईन केले.

त्यावेळी माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार, जेव्हा मीनाक्षीला समजले की, या चित्रपटात तिला माधुरी दीक्षितसोबत मुख्य भूमिकेत काम करायचे आहे, तेव्हा तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. याआधी असे झाले होते की, ‘आवारा बाप’ आणि ‘स्वाती’ या चित्रपटात मीनाक्षी ही मुख्य भूमिकेत होती, तर माधुरी दीक्षित द्वितीय मुख्य भूमिकेत  होती. पण शिनाख्त या चित्रपटात तिला द्वितीय मुख्य भूमिका मान्य नव्हती, म्हणून तिने चित्रपट करण्यास नकार दिला होता.

परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट होऊ शकला नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांना एकत्र पाहू देखील शकले नाही. या सोबतच माधुरी दीक्षित आणि मीनाक्षी शेषाद्री यांचे नाते देखील खराब झाले.(bollywood actress meenakshi seshadri refused to work with madhuri dixit)

हेही वाचा-
शाळेत असताना बनायचे होते क्रिकेटर, ‘आशिकी 2’ चित्रपटाने आदित्य रॉय कपूरला दिली खरी ओळख
एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री मीनाक्षी आता दिसतेय अशी, बँकरसोबत लग्न करून सोडला होता देश

हे देखील वाचा