Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड माधुरी दीक्षितचा खुलासा; ‘या’ कारणामुळे बुरखा घालून जावं लागलं होतं चित्रपटगृहात

माधुरी दीक्षितचा खुलासा; ‘या’ कारणामुळे बुरखा घालून जावं लागलं होतं चित्रपटगृहात

‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही नेहमीच तिच्या अदाकारीमुळे चर्चेत असते. ९०च्या दशकात माधुरीने प्रत्येक चाहत्याच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. ती ‘द कपिल शर्मा शो‘च्या एपिसोडमध्ये पोहचली होती. या शोमध्ये तिने अनेक खुलासे केले. यासोबतच ती तिच्या आयुष्यातील अनेक किस्सेही शेअर करताना दिसणार आहे.

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिलेल्या मुलाखतीत माधुरीने एक खुलासा केला आहे. ती सांगते की, तेजाब चित्रपटामधील ‘एक-दो-तीन’ हे गाणे बघण्यासाठी ती लपून चि़त्रपटगृहात पोहचली होती. प्रेक्षकांचे हावभाव जाणून घेण्यासाठी ती चि़त्रपटगृहात पोहचली होती. तेथे लोकांना कळू नये, म्हणून ती बुरखा परिधान करून बसली होती. ‘एक-दो-तीन’ गाणे वाजले की, प्रेक्षकांनी पैशांचा पाऊस पाडायला सुरुवात केला. माधुरी पुढे सांगते की, ती पहिल्या ओळीत बसली होती त्यामुळे लोकांनी फेकलेल्या पैश्यांचा वर्षाव तिच्यावर होत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरी दीक्षितने कपिल शर्माच्या शोमध्ये खूप मजेशीर किस्से सांगितले. ती सांगते की, तिच्या घरातला स्विचबोर्ड बिघडला होता, तर त्याला नीट करण्यासाठी चार माणसे तिच्या घरी आले होते.

माधुरी दीक्षितने सांगितले की, सुरूवातीला तर त्या व्यक्तीने कोणता बोर्ड खराब झाला आहे, असं विचारलं. तर तिने त्यांना बोर्ड दाखवला. बोर्ड ठिक झाल्यानंतर त्यातील तीन व्यक्ती जातात. पण एक व्यक्ती तेथेच थांबलेला असतो. ती त्या व्यक्तीला विचारते, तुम्हाला नाही जायचं का त्यांच्यासोबत? तेव्हा तो म्हणतो, मी त्यांच्यासोबत नाही तुम्हाला बघण्यासाठी आलो होतो. माधुरी दीक्षितचा (Mahuri Dixit New Web Series) हा किस्सा ऐकल्यानंतर लोक जोरजोरात हसायला लागतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव

केवळ बॉलिवूडच नाही तर टॉलिवूडमध्ये देखील ‘या’ मराठी कलाकारांनी पाडलीये छाप

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा