×

‘द कपिल शर्मा शो’मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ‘हे’ कलाकार एका भागासाठी घेतात तब्बल ‘इतके’ मानधन

‘द कपिल शर्मा शो’ सध्याच्या घडीला टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. हा शो आठवड्याच्या शेवटी केवळ दोन दिवसच प्रसारित होत असला तरी या शोने अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. संपूर्ण आठवड्याचा शीण दूर करण्यासाठी हा शो उत्तम पर्याय आहे. कोरोना काळातही या शोने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले. कपिल शर्मा आणि त्याची टीम त्यांच्या अतरंगी नाटकाने सर्वांना भरपूर हसवते. कृष्णा अभिषेक, सुमोना, भारती, किकू, चंदन आदी लोकांची ही कपिल शर्माची टीम देखील प्रसिद्धीच्या आणि लोकप्रियतेच्या बाबतीत कपिलला तगडी टक्कर देते. या सर्वांचे कॉमिक टायमिंग देखील भन्नाट असल्याने लोकांना हे कलाकार खूपच आवडतात. आपल्या हलक्या फुलक्या कॉमेडीने लोकांना पोटधरून हसवणारे हे कलाकार या शोमध्ये काम करण्यासाठी बक्कळ मानधन घेतात. चला तर मग जाणून घेऊया या शोच्या कलाकारांचे मानधन.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिल शर्मा :
‘द कपिल शर्मा शो’चा कर्ताधर्ता म्हणून कपिल शर्मा ओळखला जातो. कॉमेडी आणि उत्तम सेन्स ऑफ ह्युमरसाठी तो ओळखला जातो. या शोमध्ये अनेक मोठमोठे कलाकार त्यांच्या कलाकृती प्रमोट करण्यासाठी येतात. कपिलने त्याच्या हुशारीने त्याने या शोला यशाच्या शिखरापर्यंत पोहचवले आहे. या शोच्या एका भागासाठी कपिल तब्बल ५० लक्ष रुपये घेतो.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कृष्णा अभिषेक :
या शोमध्ये कृष्णा अभिषेक ‘सपना’ची भूमिका साकारतो. त्याचे एक ब्युटी पार्लर देखील शोमध्ये दाखवले गेले आहे. चित्र विचित्र मसाज करून देते असे सांगत सपना आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनोरंजन करत त्या पाहुण्यांना मसाजसाठी आमंत्रित देखील करते. कृष्णाची कॉमेडी देखील सर्वांना तुफान हसवते. कृष्णा अभिषेक या शोच्या एका भागासाठी १०/१२ लाख रुपये घेतो.

View this post on Instagram

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

भारती सिंग :
‘द कपिल शर्म शो’ मध्ये वेगवेगळ्या भूमिका करून सर्वांना हसवणाऱ्या भारतीची तुफान फॅन फॉलोविंग आहे. कधी ती बुवा बनते, कधी ती बच्चा यादवची पत्नी बनते. आपल्या हटके बोलण्यामुळे आणि कॉमेडी टायमिंगमुळे ती लोकांना तुफान हसवते. या शोमध्ये खूप कमी वेळेसाठी येणारी भारती एका भागासाठी १०/१२ लाख रुपये घेते.

View this post on Instagram

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen)

चंदन प्रभाकर :
चंदन प्रभाकर हा कपिल शर्माचा मित्र आहे, हे तर सर्वांनाच माहित आहे. कपिल मोठा झाला तेव्हा तो त्याच्या मित्राला देखील घेऊन मोठा झाला. या शोमध्ये देखील अनेकदा चंदन आणि कपिल यांच्या मैत्रीचा उल्लेख झाला आहे. चंदन बऱ्याचदा एका चहावाल्याच्या भूमिकेत असतो. याशिवाय तो भुरीला देखील पटवताना दिसतो. चंदन या शोमध्ये एका भागासाठी ७/८ लाख रुपये घेतो.

View this post on Instagram

A post shared by Chandan Prabhakar (@chandanprabhakar)

अर्चना पूर्ण सिंग :
नवज्योत सिंग सिद्धूला रिप्लेस करणारी अर्चना पूर्ण सिंग प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या शोमधील तिचे स्थान मोठे असून, ती परीक्षक असली तरी देखील तिला शोमध्ये खूप महत्व आहे. कपिल अनेकदा सिद्धूवरून अर्चनाची टांग खेचताना दिसतो. अर्चनावर या शोमध्ये खूप विनोद केले जातात मात्र ती हे सर्व आनंदाने घेते आणि ते एन्जॉय देखील करते. अर्चना या शोमध्ये एका भागासाठी १० लाख रुपये घेते.

View this post on Instagram

A post shared by Archana Puran Singh (@archanapuransingh)

सुमोना चक्रवर्ती :
‘द कपिल शर्मा शो’मध्ये सुमोना चक्रवर्ती भुरीची भूमिका साकारते. नेहमीच कपिल सुमोनाच्या ओठांवर कमेंट्स करत तिची टांग खेचताना दिसतो. सुमोना देखील अनेकदा त्याच्यावर चिडताना दिसते. शिवाय येणाऱ्या कलाकरांना त्याची तक्रार देखील करते. सुमोनामुळे या शोला एक वेगळी रौनक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Sumona Chakravarti (@sumonachakravarti)

किकू शारदा :
या शोमध्ये किकू बच्चा यादवची भूमिका साकारतो याशिवाय तो सनी देवोलची भूमिकेत देखील अनेकदा दिसतो. त्याची एन्ट्री नेहमीच धमाकेदार असते. तो आल्यानंतर नेहमीच जोक सांगत सर्वांना हसवतो. किकू शारदा प्रत्येक भागासाठी ६/७ लाख रुपये घेतो.

View this post on Instagram

A post shared by KUNAL VERMA (@iam_kunalverma)

हेही वाचा :

सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे बोल्ड फोटो समोर, चाहते म्हणतायेत, ‘इथे आग लागली ना राव’

मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलेल्या अनुष्का शर्माचे चमकले नशीब, ‘अशी’ मिळाली किंग खानसोबत काम करण्याची संधी

‘आमच्या पवानगीशिवाय…’ सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याचा चाहत्याने दिले ‘हे’ अनोखे आवाहन

Latest Post