हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचे (madhuri dixit) नाव सर्वप्रथम घेतले जाते. माधुरीच्या अभिनयाचे आणि निखळ सौंदर्याचे प्रत्येकजण चाहता राहिला आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ९० च्या दशकातील प्रत्येक आघाडीच्या अभिनेत्यासोबत माधुरी दीक्षितने काम केले आहे. तिच्या सौंदर्याचे आणि दिलखेचक अदांचे असंख्य चाहते पाहायला मिळतात. इंडस्ट्रीमध्ये देखील माधुरीचे भरपूर चाहते आहेत. अलिकडेच माधुरी दीक्षितने एका मुलाखतीदरम्यान चित्रपट जगतातील दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करताना तिला आलेला अनुभव आणि त्यांची खासियत सांगितली. कोणत्या अभिनेत्याबद्दल काय म्हणाली धक धक गर्ल जाणून घेऊया.
धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिंदी चित्रपट जगतावर चार दशके निर्विवाद वर्चस्व गाजवत आहे. चित्रपट जगतातील सगळ्याच प्रमुख अभिनेत्यांसोबत माधुरीने काम केले आहे. तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू आजही पाहायला मिळते. बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार अशा सगळ्याच कलाकारांसोबतचे माधुरीचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. सध्या ती आपल्या ‘द फेम गेम या’ वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान तिने या प्रमुख अभिनेत्यांबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते.
यावेळी अभिनेता शाहरुख खानबद्दल बोलताना तिने सांगितले की, “तो खूपच दयाळू आणि प्रेमळ आहे. आपल्या सह कलाकाराला त्रास होणार नाही याची तो नेहमीच काळजी घेत असतो.” त्याचबरोबर अभिनेता अक्षय कुमारबद्दल बोलताना तिने “गब्बर इज बॅक म्हणत तो नेहमीच स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सेटवरही सगळ्यात जास्त मस्ती करत असतो” असे म्हणले, तर सैफ अली खानबद्दल बोलताना तिने तो खूपच विनोदी असल्याचे सांगितले.
अभिनेता सलमान खानची विशेष आठवण सांगताना माधुरी म्हणाली की “त्याचा वेगळाच स्वॅग आहे, तो खूपच विनोदी आहे.” दरम्यान अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या आगामी द फेम गेम या वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेते संजय कपूरही काम करणार आहेत.सध्या तिच्या या आगामी वेबसिरीजची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.










