महिला दिन : बॉलिवूडच्या पहिल्या स्टंट वूमन, अभिनेत्रींसाठी केले खतरनाक स्टंट; मृत्यूला अगदी जवळून पाहिलंय

चित्रपटांमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे स्टंट बघत असतो. हे स्टंट पाहूनच नक्कीच अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवावर उदार होऊन जे कलाकार जे स्टंट करतात त्याचे आपण खूपच कौतुक करतो, मात्र खरंच कलाकारच त्यांचे हे स्टंट करतात का? तर नाही जे स्टंट खूपच अवघड असतात किंवा जे स्टंट करायला कलाकरांना योग्य वाटत नाही ते स्टंट त्या कलाकारांच्या बॉडीडबल करून घेतले जातात. आजच्या काळात बॉडीडबल ही संकल्पना सर्वांनाच माहित आहे.

मात्र पूर्वीच्या काळी ७०/८० च्या दशकात बॉडीडबल हे काम फक्त पुरुषच करायचे. अभिनेत्रींचे बॉडीडबल करायचे असेल तर त्यांना महिलांचे कपडे घातले जायचे. मात्र याच संकल्पनेला खोड देत बॉलिवूडमध्ये आल्या पहिल्या वाहिल्या महिला बॉडीडबल रेश्मा पठाण. रेश्मा या बॉलिवूडच्या पहिल्या स्टंटवूमन होत्या. तयांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये मोठमोठ्या अभिनेत्रींचे बॉडीडबल केले आहे. आज या लेखातून जाऊन घेऊया रेश्मा यांच्याबद्दल अधिक माहिती.

View this post on Instagram

A post shared by Reshma Pathan (@reshma_pathan_thesholaygirl)

शोले सिनेमा १५ आगस्ट १९७५ साली प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमातील एक सीन जेव्हा बसंतीचा टांगा दगडाला लागून तुटतो हा सीन हेमा मालिनी यांनी नाही तर रेश्मा पठाण यांनी केला होता. या सीनच्या चित्रीकरणादरम्यान टांगा तुटण्याऐवजी रेश्मा यांच्या लग्नावर पडला. ते पाहून सर्वांनाच वाटले की, रेश्मा यांचा जीव गेला मात्र त्या खूपच थोडक्यात वाचल्या होत्या. एकदा ‘कर्ज’ सिनेमात शोभा खोटे यांचे बॉडीडबल करत असताना त्यांना ट्रकने टक्कर मारली होती. रेश्मा यांनी त्यांच्या करिअरमध्ये हेमा मालिनी, श्रीदेवी, रेखा, मीना कुमारी, बिंदिया गोस्वामी आदी अनेक मोठ्या अभिनेत्रींच्या बॉडीडबलचे काम केले. रेश्मा यांनी फक्त बॉलिवूडचं नाही तर तर इतर प्रादेशिक भाषणमधील चित्रपटांमध्ये देखील बॉडीडबलचे काम केले. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की, ‘स्टंटसाठी कोणत्या भाषेची गरज नसते.’

View this post on Instagram

A post shared by Reshma Pathan (@reshma_pathan_thesholaygirl)

रेश्मा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्या चार भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षी त्यांचे करिअर सुरु केले. त्यांच्या आईला तांदूळ, कापड आणि इतर गोष्टींच्या तस्करीच्या आरोपांमध्ये अटक केले होते, तर वडील सतत आजारी असायचे. यामुळे रेश्मा यांना खूप लवकर घरात जेवण आणण्यासाठी बाहेर पडावे लागले. रेशमा यांचे काका फाइट दिग्दर्शक एस.अजीम यांच्या कामाने खूपच प्रभावित होते. त्यांनी लक्ष्मी छाया या अभिनेत्रींसाठी रेश्मा यांनी १९७२ साली ‘एक खिलाड़ी बावन पट्ट’ बॉडीडबल केले होते. तेव्हा त्यांना १७५ रुपये मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Reshma Pathan (@reshma_pathan_thesholaygirl)

या चित्रपटानंतर रेश्मा पठाण यांनी हेमा मालिनी यांच्यासाठी ‘शोले’, ‘अंधा कानून’, बिंदिया गोस्वामी यांच्यासाठी ‘शान’, रेखा यांच्यासाठी ‘मुझे मेरी बीवी से बचाओ’ आदी चित्रपटांमध्ये बॉडीडबल म्हणून काम केले. रेश्मा या हळूहळू ‘अ’ श्रेणीतील अभिनेत्रींच्या एकमेव बॉडीडबल बनल्या. मीनाकुमारी यांच्यासाठी देखील बॉडीडबलचे काम केले. रेश्मा यांच्या जीवनावर आधारित ‘द शोले गर्ल’ नावाचा सिनेमा देखील तयार झाला. या सिनेमातून त्याचे संपूर्ण जीवन पडद्यावर दाखवले गेले. बिदिता बाग यांनी रेश्मा यांची भूमिका साकारली होती. २०१७ साली गोलमाल अगेन सिनेमात त्यांनी एक छोटासा कॅमियो रोल केला होता.

हेही वाचा –

Latest Post