Thursday, March 28, 2024

पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत ‘या’ अभिनेत्रींनी दाखवला दम आणि दिली अभिनेत्यांना मात

आजच्या शतकातील महिला या पुरुषांच्या तोडीस तोड सर्वच क्षेत्रांमध्ये यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात देखील आज महिला आघाडीवर आहेत. पूर्वी फक्त ‘चूल आणि मुलं’ एवढेच जग असणाऱ्या या महिला आज संपूर्ण जगात त्याच्या नावाचा आणि कर्तृत्वाचाच डंका वाजवत आहे. आजच्या काळातील या यशस्वी महिला पाहून नक्कीच इतरांना आणि येणाऱ्या पिढीला देखील प्रेरणा मिळते. जिथे पूर्वी फक्त पुरुषांना प्राधान्य होते अशा मनोरंजन क्षेत्रात देखील आज महिलांना पुरुषांइतकेच अधिकार दिले जातात. किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिकच. अधिक फक्त पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या इंडस्ट्रीमध्ये आज महिला अभिनेत्री त्यांच्या बळावर सिनेमा, मालिका, वेबसिरीज हिट करताना दिसत आहे. आज (८ मार्च) संपूर्ण जगात जागतिक महिला दिन साजरा होत आहे. आजच्या दिनाचे औचित्य साधत जाणून घेऊया मनोरंजनविश्वातील अशा महिला अभिनेत्रींबद्दल ज्यांच्या दमदार अभिनयामुळेच त्यांच्या कलाकृतीला मिळाली ओळख.

दिल्ली क्राईम :
रिची मेहता दिग्दर्शित ही वेबसिरीज २०१२ साली दिल्लीमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या केसवर आधारित होती. या घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. या घटनेनंतर नक्की कसे पोलिसांनी आरोपीना पकडले आणि पुढच्या घटना कशा घडल्या यावर ही सिरीज भाष्य करते. या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत शेफाली शाह असून तिने दिल्ली पोलिसांची भूमिका साकारली आहे.

शी :
‘शी’ ही एक ड्रामा सिरीज असून, या सिरीजचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले असून, दिव्या जोहरीने याचे लेखन केले आहे. या सिरीजमध्ये का महिला कॉन्स्टेबलची कहाणी दाखवण्यात आली आहे. जी एक गुप्त मिशनची वेश्या बनण्याचे नाटक करते आणि मोठमोठ्या आतंकवादींना पकडते.

जमतारा :
ही एक क्राईम ड्रामा सिरीज असून, जो सौमेंद्र पाधी यांनी त्याचे दिग्दर्शन केले तर त्रिशांत श्रीवास्तव यांनी याचे लेखन केले. या सिरीजमध्ये छोट्या शहरातील अशा मुलांची कथा दाखवण्यात आली आहे, जे पैसे कमवण्यासाठी मोठ्या स्तरावर व्हॉइस फिशिंग रॅकेट तयार करतात. ही सिरीज सुप्रिटेंडन्ट जया रॉय यांच्या खऱ्या आयुष्यवर आधारित आहे.

ग्रहण :
‘ग्रहण’ ही सिरीज नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले असून निर्मिती शैलेंद्र कुमार झा यांची आहे. सत्य व्यास यांची कादंबरी असणाऱ्या ‘चौरासी’वर ही सिरीज आधारित आहे. १९८४ साली बोकारो झारखंड येथे शीख विरोधी झालेल्या दंगलीची कथा यात आहे. सिरीजमध्ये जोया हुसैनने एस पी अमृता सिंग ही भूमिका साकारली आहे.

फ्लॅश :
फ्लॅश ही एक क्राईम थ्रिलर वेबसिरीज असून, याचे लेखन पूजा लधा सुरती यांनी केले असून, दानिश अस्लम यांनी दिग्दर्शन केले आहे. सिरीजमध्ये स्वरा भास्करने एसीपी ऑफिसरची भूमिका साकारली असून, ही सिरीज मनुष्य आणि यौन तस्करीवर भाष्य करते.

हंड्रेड :
ही एक ऍक्शन कॉमेडी सिरीज असून यात लारा दत्ता आणि रिंकू राजगुरू यांच्या मुख्य भूमिका आहेत.याचे दिग्दर्शन रुची नारायण, आशुतोष शाह, ताहिर शब्बीर यांनी केले असून, यामध्ये दोन पूर्णपणे वेगळे असलेल्या व्यक्तींची कहाणी दाखवली आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा