Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड माधुरी दीक्षितच्या ‘अनामिका’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सिनेमाच्या निमित्ताने धक धक गर्लचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण

माधुरी दीक्षितच्या ‘अनामिका’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, सिनेमाच्या निमित्ताने धक धक गर्लचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण

 

बॉलिवूडमध्ये धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांबरोबर तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. माधुरी दीक्षितचा चित्रपटसृष्टीत प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. तिचा एखादा नवीन चित्रपट येणार म्हटले, तरी तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण असते. तिचे चाहते तिचा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, आता तिच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. माधुरी दीक्षित लवकरच आपल्या ‘अनामिका’ चित्रपटाद्वारे ओटीटी प्लेटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ती तिच्या या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

माधुरीच्या ‘फाइंडिंग अनामिका’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून सर्वत्र चर्चा होत होती. आज अखेर तिच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जो माधुरीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही अनामिकाला भेटायला तयार आहात का?”

 

माधुरीच्या या चित्रपटाची कथा एक सुपरस्टार, एक पत्नी आणि एका आईची आहे, जी अचानक एक दिवस बेपत्ता होते. पोलीस आणि जवळचे लोक अनामिकाच्या बेपत्ता होण्यासाठी कुटुंबातील लोकांकडे उत्तर मागतात. यादरम्यान अनामिकाच्या आयुष्यातील सत्य, खोटेपणा आदी अनेक गोष्टी ती बेपत्ता झाल्यानंतर उघडकीस येतात. चित्रपटाचा ट्रेलर छोटा असला तरी खूप चांगला आहे. माधुरीचा हा चित्रपट करण जोहर, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा हे सर्वजण एकत्रपणे निर्मित करत आहेत. चित्रपटाची कथा श्री राव आणि निशा मेहता यांनी लिहिली असून, यात माधुरी दीक्षित, संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन, सुहासिनी मुळे आणि मुस्कान जाफरी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

माधुरी शेवटची रुपेरी पडद्यावर करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटात दिसली होती. आता ती करण जोहरच्याच ‘अनामिका’ चित्रपटातून तिच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘अनामिका’च्या पहिल्या ट्रेलरमध्ये फक्त माधुरी दीक्षितच्या पात्रावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. माधुरी या ट्रेलरमध्ये खूपच सुंदर दिसली आहे. तिच्या सिनेमाचा ट्रेलर पाहून चित्रपटाबद्दल उत्सुकता अधिकच वाढली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा

‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट

हे देखील वाचा