जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा


मुलगी ही आई वडिलांच्या आयुष्यातील एक अनमोल भेट असते. याच कन्येचा सन्मान करण्यासाठी रविवारी (२६ सप्टेंबर) सर्वत्र जागतिक कन्यादिन साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधत अनेक कलाकार त्यांच्या मुलींना कन्यादिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट हिरो अशी ओळख असणाऱ्या स्वप्नील जोशीने देखील त्याच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

स्वप्नीलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याची मुलगी मायरासोबत काही गोड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याने मायरासोबत तिच्या जन्मापासून ते आतापर्यंत अनेक फोटोंची झलक सर्वांना दाखवली आहे. या फोटोमध्ये बाप-लेकीची केमिस्ट्री स्पष्ट दिसत आहे. ते दोघेही खूप मस्ती करत आहेत. (Marathi actor Swapnil joshi give wishesh of World’s daughter day to his daughter )

हे फोटो शेअर करून त्याने “कन्यादिनाच्या हार्दिक शुभेच्छा मायरा” असे कॅप्शन दिले आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोवर त्याचे अनेक चाहते तसेच कलाकार त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने “माझी आहे मायरा,” अशी कमेंट केली आहे तर स्वप्नीलने देखील तिला “हो” असा रिप्लाय दिला आहे. यासोबत सचिन कुंभार, श्रेया बुगडे आणि कणिका माहेश्वरी यांनी हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत.

स्वप्नील जोशी हा चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने ‘मितवा’, ‘दुनियादारी’, ‘लाल इश्क’, ‘भिकारी’, ‘श्री कृष्ण’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘रणांगण’, ‘वेलकम जिंदगी’, ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘फुगे’, ‘फ्रेंड्स’, ‘मी पण सचिन’, ‘आम्ही सातपुते’, ‘चेकमेट’, ‘गोलमाल’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. सध्या तो ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज


Leave A Reply

Your email address will not be published.