अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट


कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चित्रपटगृह बंद होती. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी सरकारने टाळेबंदी लावली होती. त्यामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले. तर काही चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्माते चित्रपटगृह खुली होण्याची वाट बघत होते. अशातच सरकारकडून येत्या २३ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह आणि नाट्यगृह खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी मिळाल्यामुळे अनेक निर्माता आणि दिग्दर्शकांना जणू संजीवनीच मिळाली आहे. सिनेमागृह बंद असल्याने अनेक मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. यातच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा ‘८३’ हा बहुप्रतीक्षित सिनेमा देखील होता. हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी खूप वाट बघितली आहे. अशातच ‘सूर्यवंशी’ नंतर आता ‘८३’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. रणवीर सिंगने स्वतः त्याच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे.

रणवीर सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट करून त्याच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, “आता वेळ आली आहे. ‘८३’ हा चित्रपट ख्रिसमसला हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत चित्रपटातगृहात प्रदर्शित होणार आहे.”
(Ranveer Singh and deepika padukone’s film 83 will release on Christmas 2021)

‘८३’ या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दीपिका पदुकोण दिसणार आहे. या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाने १९८४ साली जो वर्ल्डकप जिंकला होता त्या कहाणीवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे.

या चित्रपटात रणवीर सिंग भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव याचे पात्र निभवणार आहे. तर दीपिका पदुकोण कपिल देवची पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे दोघे लग्नानंतर पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

तसेच या चित्रपटात पंकज त्रिपाठी, आर बद्री, एमी विर्क, साहिल खट्टर, दिनकर शर्मा, चिराग पाटील, ताहीर राज भसीन यांसारखे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात ‘१९८३’ मध्ये भारताने जिंकलेल्या वर्ल्ड कपमधील अनेक गोष्टी दाखवल्या जाणार आहेत. तसेच कपिल देवच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटना देखील दाखवल्या जाणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज


Leave A Reply

Your email address will not be published.