Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाल्यामुळे माहिरा आली नेटिझन्सच्या निशाण्यावर,अभिनेत्रीने ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर

लोकप्रिय अभिनेत्री माहिरा खानने तिच्या अभिनयाच्या बळावर पाकिस्तानपासून भारतापर्यंत हजारो लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. बॉलिवूडचा किंग म्हणजेच शाहरुख खानसोबत ‘रईस‘ चित्रपटात काम करून तिने खूप प्रशंसा मिळवली. मात्र, अनेकदा माहिराला ट्राेलिगंचा देखील सामना करवा लागला. एकदा माहिराचा आणि रणबीर कपूरचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, त्यानंतर तिच्या आणि अभिनेत्याच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अलीकडेच अभिनेत्री आता परदेशात आयोजित केलेल्या एका अवॉर्ड शोमुळे चर्चेत आली आहे, ज्याने तिला अनेक टीकेला सामोरे जावे लागत आहे.

तर झाले असे की, यावेळी पाकिस्तानमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. ज्यामुळे सामान्य लोकांचे खूप नुकसान झाले.अशात विदेशात आयोजित अवॉर्ड शोमध्ये अनेक पाकिस्तानी कलाकारांनी हजेरी लावली. या अवॉर्ड शोमध्ये माहिरा खान (Mahira Khan) हिने देखील सहभाग घेतला होता. परिणामी अनेक पाकिस्तानी कलाकारांना टीकेला सामोरे जावे लागले. यामध्येलोकप्रिय कलाकार म्हणजे अभिनेत्री माहिरा खान हीचा देखील समावेश होता. नेटिझन्सने माहिरावर निशाण साधत तिला प्रचंड ट्रोल केले. यावर पहिल्यांदाच माहिराने तिची प्रतिक्रिया शेअर करत ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिले.

माहिराने ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर देत लिहिले, “आमच्यासाठी काहीही योग्य नाही, तुमच्या देशाचे कलाकार! मी माझे काम करत राहणार. जर तुम्हाला ते आनंदित करत असेल, तर मी मदतीदरम्यान काही फोटो घेऊ शकते. अरे, पण मग असे म्हटले जाईल दान करण्याचे ढोंग करत आहे. अशा वाईट गोष्टी कधीच संपत नाहीत. तुम्हाला काय करायचे आहे ते करा. मी माझे करीन.”

माहिराच्या या उत्तराच्या समर्थनार्थ अनेक सोशल मीडिया यूजर्स समोर आले. ते केवळ माहिराच नाही तर या सर्व सेलिब्रिटींना सपोर्ट करताना दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्स म्हणाले, “जर स्टार्स अवॉर्ड शोमध्ये गेले असतील तर ते त्यांच्या कामाचा भाग आहे.” तर झाले असे की, एका यूजरने माहिराला टार्गेट करत लिहिले , “जर कलाकारांनी कार्यक्रमात घातलेले कपडे पूरग्रस्तांना दिले, तर सर्व काही ठीक होईल.”

माहिराच्या काराकीर्दी विषयी बोलायचे झाले, तर माहिराने टीव्ही शोपासून चित्रपटांमध्ये काम केले आहे. माहिरा सध्या ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत फवाद खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट पाकिस्तानमध्ये 13 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. फवाद खान आणि माहिरा व्यतिरिक्त या चित्रपटात हमजा अली अब्बासी आणि हुमैमा मलिक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
याला काय अर्थय! ऋतिक- सैफच्या ‘विक्रम वेधा’चे ओपनिंग कलेक्शन अक्षयच्या फ्लॉप सिनेमांपेक्षाही कमी, फक्त…

कुणाचं घड्याळ हरवलंय का? कदाचित उर्फीजवळच असेल, पाहा तिचा ‘हा’ व्हिडिओ

हे देखील वाचा