Friday, March 29, 2024

कुणाचं घड्याळ हरवलंय का? कदाचित उर्फीजवळच असेल, पाहा तिचा ‘हा’ व्हिडिओ

टीव्ही इंडस्ट्रीत अनेक अभिनेत्री आहेत, पण त्या सगळ्या अभिनेत्रींमध्ये उर्फी जावेद हीच कदाचित चाहत्यांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेत असावी. कारण, उर्फी दरदिवशी तिच्या अतरंगी फॅशन सेन्सने खळबळ माजवत असते. उर्फीने आतापर्यंत अनेक प्रयोग करून पाहिले आहेत. त्यात सेमी न्यूड, न्यूड लूक, टॉपलेस किंवा ब्रालेस यांचा समावेश आहे. कधी ब्लेडपासून, कधी फाटलेल्या कपड्यांपासून, गुलाबाच्या पाकळ्यांपासून, वृत्तपत्रांपासून अशा अनेक गोष्टींपासून ड्रेस बनवला आहे. आता तिने अशी काही स्कर्ट परिधान केली आहे, ज्याबद्दल कुणी स्वप्नातही विचार केला नसेल.

उर्फीने लेटेस्ट लूकने वेधले लक्ष
अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिने लेटेस्ट लूक जो परिधान केला आहे, तो आजपर्यंत कदाचितच कुणी परिधान केला असेल. उर्फीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रील शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने आतापर्यंतचा सर्वात अतरंगी ड्रेस परिधान केला आहे. यावेळी उर्फी ब्रालेसही नाहीये आणि टॉपलेसही नाहीये. मात्र, तरीही तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

बारीक दोरीने घड्याळ शिवत बनवला ड्रेस
उर्फीने वरच्या भागात फिक्कट जांभळ्या रंगाचा एक साधा टॉप परिधान केला आहे. या लूकमध्ये लक्ष वेधणारी गोष्ट उर्फीची स्कर्ट आहे. या लूकमध्ये उर्फीने एक खूपच बोल्ड आणि वेगळ्या पद्धतीची स्कर्ट परिधान केली आहे. यामध्ये पूर्ण स्कर्ट कोणत्याही कपड्याने बनलेली नव्हती, तर घड्याळांनी बनवलेली आहे. एका पातळ दोरीने घड्याळे शिवत उर्फीने स्कर्ट बनवली आहे. घड्याळांच्या स्कर्टमध्ये तिचे अंतर्वस्त्रही दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जरी सिनेमात दिसत नसली, तरीही तिचा भलामोठा चाहतावर्ग आहे. तिला इंस्टाग्रामवर 36 लाख चाहते फॉलो करतात. ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच नवनवीन प्रयोग केलेल्या ड्रेसमधील व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने एक लाल रंगाचा आऊटफिट परिधान केला होता, जो भलताच चर्चेत होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नागराज मंजुळे पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीला देणार 100 कोटींचा सिनेमा? नुकतीच केलीय घोषणा
‘तोंड जरा सरळ ठेवून नाच’, शहनाज गिलची कॉपी केल्याने मलायकावर भडकले चाहते; पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा