Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ‘तोंड जरा सरळ ठेवून नाच’, शहनाज गिलची कॉपी केल्याने मलायकावर भडकले चाहते; पाहा व्हिडिओ

‘तोंड जरा सरळ ठेवून नाच’, शहनाज गिलची कॉपी केल्याने मलायकावर भडकले चाहते; पाहा व्हिडिओ

अभिनेत्री शहनाज गिल हिने खूप कमी कालावधीत मोठा चाहतावर्ग मिळवला आहे. ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या डाऊन टू अर्थ स्वभावासाठीही ओळखली जाते. शहनाज तिला आवडेल, ते काम बिनधास्तपणे करते. मागील काही दिवसांपूर्वी शहनाजचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अभिनेत्री रँप वॉकदरम्यान डान्स करताना दिसली होती. कारण, बॅकग्राऊंडमध्ये वाजत असलेले गाणे तिला भलतेच आवडले होते. आता मलायका अरोरा ही अभिनेत्रीदेखील असेच काहीसे करताना दिसली. त्यावरून तिला चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरू केले.

मलायकाने शहनाजला केले कॉपी?
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती फॅशन शोमध्ये रँप वॉकदरम्यान डान्स करताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. मात्र, काहींनी तिच्यावर शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिला कॉपी करण्याचा आरोप लावला आहे. चाहत्यांनी तिला असे केल्यामुळे भलतेच ट्रोल केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने कमेंट करत लिहिले की, “शहनाजचा डान्स पाहून आता सगळेच रँपवर नाचतील.” अनेक लोकांनी या कमेंटला रिप्लाय दिला. एकाने लिहिले की, “मी पण हाच विचार करत होतो.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “ही कधीच तोंड सरळ ठेवून का नाचत नाही?” दुसरीकडे काही लोकांनी मलायकाची प्रशंसाही केली आहे. एकाने लिहिले की, “ही काळानुसार आणखीच कूल होत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

मलायका अरोराच्या लूकने जिंकली चाहत्यांची मने
अभिनेत्री मलायका अरोरा या फॅशन शोमध्ये स्टॉपर बनली होती. ती या शोमध्ये पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान करून पोहोचली होती. तिने बिनधास्त अंदाजात डान्स करण्यास सुरुवात केली. तिच्यासोबत असणाऱ्या इतर मॉडेल्सनीही डान्स केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘बिग बॉस 16’मध्ये येणार वादळ! दोन नवीन स्पर्धकांची झालीय एन्ट्री; एक पॉलिटिशन, तर दुसरा रॅपर
घटस्फोटाच्या बातम्यांमध्येच दीपिका अन् रणवीरची ‘तसली’ चॅट आली समोर, तुम्हीही वाचाच

हे देखील वाचा