अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची गणना बॉलिवूडच्या पावर कपलमध्ये केली जाते. ते त्यांच्या क्यूट केमिस्ट्रीने नेहमीच चाहत्यांना खुश करत असतात. विशेष म्हणजे, घर असो, सिनेमाचे सेट असो किंवा सार्वजनिक ठिकाण असो हे जोडपे कधीच एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्याची संधी सोडत नाहीत. मात्र, मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशा अफवा पसरल्या होत्या की, रणवीर आणि दीपिकामध्ये काहीतरी बिनसलं आहे. तसेच, ते वेगळे होणार आहेत. मात्र, या सर्वांवर पूर्णविराम लावण्याचे काम या जोडप्याच्या चॅटने केले आहे. त्यावरून समजते की, दोघांमध्ये सर्वकाही ठीक आहे.
नुकतेच अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रणवीरचा अतरंगी फॅशन सेन्स कमालीचा दिसत आहे. त्याचे हे लेटेस्ट फोटोशूट आहे. या फोटोंमध्ये रणवीर गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. त्याचा हा कूल अंदाज चाहत्यांसोबतच कलाकारांचेही लक्ष वेधून घेत आहे. या फोटोंसोबत रणवीरने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे.
View this post on Instagram
रणवीरच्या या पोस्टवर अभिनेत्री आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने मजेशीर कमेंट केली आहे. यावरून स्पष्ट झाले आहे की, ते दोघे आजही एकमेकांच्या प्रेमात ठार वेडे आहेत. दीपिकाने तिच्या प्रेमळ पतीच्या पोस्टवर कमेंट करत “खाण्यासाठी योग्य,” असे लिहिले आहे. यासोबतच तिने क्यूट चेहऱ्याचा इमोजीही वापरला आहे. दुसरीकडे, दीपिकाच्या या कमेंटवर रिप्लाय देत रणवीरने किसींग इमोजी वापरला आहे.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone And Ranveer Singh) हे दोघेही 14 नोव्हेंबर, 2018 रोजी लग्नबंधनात अडकले होते. यापूर्वी दोघांनीही एकमेकांना अनेक वर्षे डेट केले होते. या जोडप्याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर रणवीर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्ट हीदेखील झळकणार आहे. दुसरीकडे, अभिनेत्री दीपिका पदुकोण ही शाहरुख खान याच्यासोबत ‘पठाण’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! ब्रेकअप होऊनही रश्मिका मारते एक्स बॉयफ्रेंडच्या घरी चकरा, स्वत:च केला खुलासा
‘तुम्ही चिरंजीवी आणि रामसाठी माझे प्रेम विकत घेऊ शकत नाही’, पैसे ऑफर करणाऱ्या निर्मात्यावर भडकला सलमान