Friday, July 5, 2024

अगं बाई मोडशील ना!! डोक्यावर उभे राहून मलायकाने केला प्रेक्षकांना नमस्कार

वयाच्या चाळिशीतही आपल्या फिटनेसने सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. तिच्या स्लिम बॉडीमुळे ती सर्वत्र चर्चेत असते. तिचे वेगवेगळ्या बोल्ड फोटोंनी ती प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. ती तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत असते. तिने नुकताच योगा करतानाचा एक व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे

या व्हिडिओमध्ये मलायका योगा करताना दिसत आहे. यात तिने तिचे पाय डोक्याच्या जोरावर वर घेतले आहेत. प्रेक्षकांना ती नमस्कार करत आहे. तिच्या या व्हिडिओवर प्रेक्षकांकडून खूपच प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

मलायकाने हा व्हिडिओ शेअर करत असे लिहले आहे की, “काही मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या चरणाजवळ जावे लागते. त्यामुळे या आठवड्यात आपण असा एका व्यायाम शिकणार आहोत जो तुम्हाला एक पूर्ण मुद्रा प्राप्त करायला मदत करेल. प्रत्येक गोष्ट करायला वेळ लागतो. परंतु जोपर्यंत ती गोष्ट प्राप्त होत नाही, तोपर्यंत प्रयत्न सोडू नका.”

मलायकाच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूपच पसंती मिळत आहे. या व्हिडिओला केवळ एका तासात एक लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. मलायकाने आपल्या डान्सच्या जोरावर सर्वत्र आपली ओळख बनवली आहे. ‘छैया छैया’ या गाण्याने तिच्या करिअरला वळण मिळाले. त्यानंतर तिने अनेक आयटम साँग केले. ‘मुन्नी बदनाम हुई’ यांसारख्या गाण्यावर डान्स करून तिने तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. आपल्या डान्ससोबतच ती तिच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षरा सिंगने मारला डोळ्यांचा बाण, तर चाहत्यांच्या हृदयावर झाला जोरदार वार!

-अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड डान्स व्हिडिओ; ‘या’ भितीपोटी बंद केला कमेंटचा पर्याय

-बॉबी देओल बनला अंपायर! मीम्स शेअर करत नेटकऱ्यांनी उडवली डान्सची थट्टा

हे देखील वाचा