अक्षरा सिंगने मारला डोळ्यांचा बाण, तर चाहत्यांच्या हृदयावर झाला जोरदार वार!

bhojpuri actress akshara singh killed with her glamorous video watch here bhojpuri south ditish


भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंग चित्रपटातील तिच्या उत्तम अभिनयाने चाहत्यांना वेड लावत असते. ती तिच्या इंस्टाग्राम व्हिडिओंद्वारे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या पोस्टमध्ये कधीकधी सुंदर फोटो असतात, तर काही वेळा ती मजेदार व्हिडिओ पोस्ट करते. अक्षराने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिला पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढणार आहेत.

‘एक्सप्रेशन क्वीन’ अक्षरा सिंगने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे. व्हिडिओमध्ये ती डोळा मारताना दिसत आहे. एवढेच नाही तर ती किसही करत आहे.

अभिनेत्रीचा हा अंदाज पाहून तिचे चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत अक्षराने लिहिले की, “ही माझी स्टाईल आहे.” अभिनेत्रीच्या या व्हिडिओचे चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे. तसेच, या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंटही करत आहेत.

अक्षराच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिचा ‘डोली’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीझ झाले होते. महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारा हा चित्रपट आहे. लॉकडाऊनपूर्वी चित्रपटाचे शूटिंग यूपीमध्ये करण्यात आले होते, ज्याचे पोस्ट प्रॉडक्शन आता सुरू आहे.

अक्षरा सिंग अशी पहिली गायिका आहे, जिला दरवर्षी लाखो फॉलोअर्स फॉलोव करतात. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात कोणीतरी तिला सतत विचारत आहे की, मॅडम, तुम्ही बिहारी आहात का? त्यावर ती चिडून म्हणते, तेच तेच बोलून डोक्यावर का भुंकत आहेस! तिचा हा मजेदार व्हिडिओही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एक्स्प्रेस क्वीन’ जुही चावलानेही फॉलो केला ‘पावरी’ ट्रेंड, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-करण सिंग ग्रोव्हरच्या एक्ससाईज व्हिडिओवर चाहत्यांसोबत पत्नी बिपाशा बासूही फिदा, एकदा पाहाच

-बॉबी देओल बनला अंपायर! मीम्स शेअर करत नेटकऱ्यांनी उडवली डान्सची थट्टा


Leave A Reply

Your email address will not be published.