अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड डान्स व्हिडिओ; ‘या’ भितीपोटी बंद केला कमेंटचा पर्याय

bhojpuri actress akanksha dubey posts sensual dance video on instagram hides comment section see video bhojpuri south ashas


भोजपुरी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबे तिच्या बोल्ड आणि सेक्सी स्टाईलमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. चाहत्यांनाही तिचा लूक आणि तिचे बोल्ड फोटोज खूप आवडतात. हेच कारण आहे की, अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 1 लाख 70 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर फोटोंशिवाय ती अनेक व्हिडिओही पोस्ट करत असते, ज्यात ती चित्रपटातील गाण्यांवर अभिनय करताना किंवा डान्स करताना दिसत असते.

नुकताच आकांक्षाने तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओची खास गोष्ट म्हणजे, आकांक्षा यात अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये डान्स करताना दिसली आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि तिचा डान्स या दोन्ही गोष्टी खूप कामुक दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये आकांक्षाने ‘राज’ या चित्रपटाच्या ‘आप के प्यार में हम सवरने लगे’ या गाण्यावर डान्स केला आहे. हे गाणे अलका याग्निक यांनी गायले होते. त्याकाळी हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते, कारण या गाण्यात बरेच बोल्ड सीन आहेत. तसेच, ‘राज’ हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता.

या व्हिडिओमध्ये आकांक्षाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. यासह तिच्या चेहऱ्यावरील भावही अप्रतिम दिसत आहेत. तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये फायर ईमोजी पोस्ट केले आहेत. खरं तर तिने या व्हिडिओद्वारे सोशल मीडियाला खरोखरच आग लावली आहे. व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस तर पडत आहे. मात्र, कमेंट्स येत नाहीत. याचे कारण असे की, तिने व्हिडिओवर कमेंट करण्याचा पर्याय लपविला आहे, जेणेकरुन कोणताही युजर तिच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

याशिवाय, आकांक्षा लवकरच सुपरस्टार दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआ याच्यासोबत होळीच्या गाण्यात दिसणार आहे. या गाण्याचे नाव आहे ‘भौजइयन से पाला पडे.’

सोमवारी (15 मार्च) आकांक्षाने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली होती. तिने फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले, ‘लवकरच येत आहे!’ (coming soon!). या गाण्याला महिपाल भारद्वाज यांनी संगीत दिले आहे, तर बोल विमल बावरा आणि राणा सिंग यांचे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एक्स्प्रेस क्वीन’ जुही चावलानेही फॉलो केला ‘पावरी’ ट्रेंड, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-करण सिंग ग्रोव्हरच्या एक्ससाईज व्हिडिओवर चाहत्यांसोबत पत्नी बिपाशा बासूही फिदा, एकदा पाहाच

-बॉबी देओल बनला अंपायर! मीम्स शेअर करत नेटकऱ्यांनी उडवली डान्सची थट्टा


Leave A Reply

Your email address will not be published.