Monday, February 10, 2025
Home मराठी ‘इंडियन आयडल’ या शोचे स्वानंदी टिकेकर ऐवजी ‘ही’ अभिनेत्री करणार सूत्रसंचालन, वाचा सविस्तर

‘इंडियन आयडल’ या शोचे स्वानंदी टिकेकर ऐवजी ‘ही’ अभिनेत्री करणार सूत्रसंचालन, वाचा सविस्तर

सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल’ हा शो चांगलाच चर्चेत आहेत. हा शो पहिल्यांदाच मराठीमध्ये सुरू झाला आहे. या शोला प्रेक्षकांचे देखील चांगलेच प्रेम मिळताना दिसत आहे. या शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकर करत होती. तिचे सूत्रसंचालन सगळ्यांना आवडत होते. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, स्वानंदी आता या शोचे सूत्रसंचालन करणार नाही. तिच्याऐवजी दुसऱ्या एका अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार स्वानंदी टिकेकर (swanandi tikekar) ऐवजी या शोचे सूत्रसंचालन आता अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) करणार आहे. परंतु स्वानंदी या शोचे सूत्रसंचालन का करणार नाही याची अधिकृत माहिती अजूनही समोर आली नाही. प्राजक्ताला या शोचे सूत्रसंचालन करताना पाहण्यासाठी आता तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. तिचा अभिनय आणि सूत्रसंचालन सगळ्यांना खूप आवडते. (Swanandi tikekar leaved Indian idol show’s hosting, this actress will come)

प्राजक्ताने या आधी अनेक मालिका आणि चित्रपटात काम करून तिचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. तिने ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या शोचे सूत्रसंचालन देखील केले आहे. त्यानंतर तिच्यातील गुण वैशिष्ट समोर आले आणि प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले.

प्राजक्ता एक उत्तम, अभिनेत्री, डान्सर, सूत्रसंचालक तसेच कवयित्री देखील आहे. तिन तिचे :प्राजक्तप्रभा’ हे पुस्तक देखील प्रकाशित केले आहे. तसेच मागील काही दिवसांपूर्वी तिने तिची स्वतःची निर्मिती संस्था देखील लॉन्च केली आहे. अभिनयाने ती सगळ्यांना भुरळ घालतच असते. अशातच या नव्या भूमिकेत तिला पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा