बॉलिवूडमधील अत्यंत हॉट ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा. ती तिच्या ग्लॅमरस अंदाजात नेहमीच प्रेक्षकांना स्वतःकडे आकर्षित करत असते. मलायका ही अभिनयासोबतच आपल्या फिटनेससाठी खूप काही करत असते. ती प्रत्येक गोष्ट करते, ज्यामुळे ती फिट राहील आणि त्यातील एक गोष्ट म्हणजे डान्स. तिने ‘चल छैया छैया’ पासून ते ‘मुन्नी बदनाम हुई’ पर्यंत अनेक गाण्यावर डान्स केला आहे. यामुळेच ती अनेक डान्स रिऍलिटी शोमध्ये जजच्या रुपात दिसून येते. मलायकाने ‘इंडियास बेस्ट डान्सर’ या शोमध्ये एका मराठी गाण्यावर डान्स केला होता, जो तुफान व्हायरल झाला होता.
बाप्पा स्पेशल वीकमध्ये मलायकाने लाल रंगाची बनारसी साडी घातली होती. जेव्हा या शोची होस्ट भारती सिंग हिने मलायकाला स्टेजवर आमंत्रित केले. तेव्हा मलयिकाने मराठी स्टाईलमध्ये डान्स केला. तिथे तिला मराठी अभिनेत्री ‘सुप्रिया पिळगावकर’ हिने तिला साथ दिली.
या शोमध्ये सुप्रिया पिळगावकर हिला गेस्ट म्हणून आमंत्रित केले होते. दोघींनीही स्टेजवर दाबरदस्त डान्स केला होता. त्यांचा हा डान्स बघून सगळे स्पर्धक आणि बाकी जज देखील त्यांच्यासोबत डान्स करायला स्टेजवर आले.
मलायकाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. ती अनेक व्हिडिओ अल्बममध्ये दिसली होती. त्यानंतर तीला अनेक चित्रपटांची ऑफर आली. तिने ‘बिच्छु’ या चित्रपटात एक छोटंसं पात्र निभावलं होतं. परंतु तिला तिच्या डान्समुळे खूप ओळख मिळाली. ‘दिलं से’ या चित्रपटातील ‘छैया छैया’ या गाण्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या गाण्यात तिने शाहरुख खान सोबत चालत्या ट्रेनमध्ये डान्स केला होता.
याशिवाय तिने अनारकली, मुन्नी बदनाम, फॅशन खत्म खत्म मुझ पे, पांडे जी सिटी यांसारख्या गाण्यांमध्ये तिने डान्स केला. सध्या ती अर्जुन कपूर सोबत असणाऱ्या नात्यामुळे खूपच चर्चेत आहे.