Friday, February 3, 2023

चित्रपटात 17 किसींग सीन देऊन आली होती चर्चेत, खूप कठीण होता मल्लिका शेरावतचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास

बॉलिवूडची अभिनेत्री आणि आपल्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या मल्लिका शेरावत हिने आपली कारकिर्द घडवण्यासाठी अनेक संकटांचा सामना केला आहे. इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी तिचे नाव रीमा लांबा असे होते. तिचे हे मूळ नाव आहे. तिचे कुटुंबीय चित्रपटात काम करण्याच्या विरोधात होते. मल्लिकाला तिच्या वडिलांना दिल्लीच्या मिरांडा कॉलेजची पदवीधर सरकारी अधिकारी बनवायचे होते. पण मल्लिकाचे मन चित्रपटसृष्टीत येण्याचे होते. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने घर सोडले. रविवारी (24 ऑक्टोबर) मल्लिका शेरावत आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग तिच्या वाढदिसानिमित्त तिचा रीमा लांबा ते मल्लिका शेरावत पर्यंतचा खडतर प्रवास जाणून घेऊया.

मल्लिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. टीव्ही ॲडमध्ये तिला अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानसारख्या बड्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

चित्रपट जगतात हात आजमावणाऱ्या मल्लिकाला ‘जीना सिर्फ मेरे लिया’ या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. पण २००३ मध्ये आलेल्या ‘ख्वाइश’ चित्रपटातील मल्लिकाच्या किसिंग सीनमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र तिचा हा चित्रपट हिट झाला नाही आणि बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटात मल्लिकाने १७ किसिंग सीन दिले होते, ज्यामुळे बराच गोंधळ उडाला होता.

मल्लिकाने तिच्या पुढच्या ‘मर्डर’ चित्रपटात असे बोल्ड सीन्स दिले की, मल्लिकाच्या नावाचा डंका वाजू लागला. अनुराग बसूच्या या चित्रपटात काम केल्यानंतर मल्लिकाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली होती.

मल्लिकालाही याचा फायदा झाला. तिला हॉलिवूड चित्रपटात काम मिळाले. जेव्हा मल्लिकाने जॅकी चॅनसोबत ‘मिथक’ चित्रपटात काम केले, तेव्हा जबरदस्त चर्चा आणि प्रसिद्धीही झाली. मल्लिकाने ‘हिस्स’, ‘डबल धमाल’, ‘डर्टी पॉलिटिक्स’, ‘बचके रेहना रे बाबा’, ‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मल्लिकाच्या चित्रपट प्रवासात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विवाहित जीवन, एका मुलाची आई यामुळेही ती खूप चर्चेत राहिली होती. मल्लिकाने माध्यमांना दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, तिला एका कठीण टप्प्यातून जावे लागले आहे. मल्लिकाने वेब सीरिजमध्येही काम केले आहे. आजही मल्लिकाच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्डनेसची चर्चा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
मल्लिका शेरावतच्या गोल्डन ड्रेसमधील फोटोने लावली सोशल मीडियावर आग, चाहतेही म्हणाले, ‘हॉलिवूड स्टाईल…’

चाहत्यांना बेधुंद करणारा भूमीचा लूक, फोटो पाहून काळजात वाजेल घंटी

हे देखील वाचा