मला हिरोईन व्हायचं आहे, असे स्वप्न मनाशी धरून अनेक तरुणी वेगवेगळ्या गावांवरून मुंबईमध्ये येतात. स्वप्नांच्या नगरीमध्ये पाय ठेवल्यांनंतर बॉलिवूडच्या हायवेवरील मॉडलिंगचा रस्ता पकडतात. यामध्ये काही जणी यशाचे शिखर गाठतात, तर काही जणी या मायानगरीच्या जाळ्यात अडकतात. अशात अनेक अभिनेत्री कुटुंबियांच्या विरोधात जाऊन घरातून पळून येतात आणि मोठी अभिनेत्री होण्यासाठी मेहनत करतात. यातीलच एक मल्लिका शेरावत.
सर्वसामान्य तसेच प्रतिष्ठित घरांमध्ये आजही मुलींवर अनेक बंधने लादली जातात. असेच बंधन मल्लिकावर देखील तिच्या वडिलांनी लादले होते. पण तिने ते झुगारून लावले. या अभिनेत्रीने आपल्या बोल्डनेसने आणि हटके अदांनी अनेक चाहत्यांची मने घायाळ केली आहेत. चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका आणि आपल्या दमदार अभिनयासह हॉट लूकमुळे यशाचे शिखर गाठलेले आहे. (Actress Mallika Sherawat reveals why she rejected her father surname)
वडिलांचे आडनाव न लावण्याचा केला निश्चय
अभिनेत्रीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. तिने तिच्या वडिलांबरोबर अर्वाच्च शब्दात संवाद साधला होता. मल्लिका म्हणाली होती की, “मी पितृसत्तेच्या विरोधात होते. कारण माझे वडील म्हटले होते की, मी चित्रपटांमध्ये गेले, तर माझ्या घराचे नाव खराब होईल. मी तुला नाकारतो आहे. त्यावर मी म्हणाले की, तू काय मला नाकारतोस मीच तुझे आडनाव नाकारते. तू माझा बाबा आहेस म्हणून तुझा मला आदर आहे, पण मी माझ्या आईचे आडनाव इथून पुढे वापरणार.”
मल्लिकाचे कुटुंबीय हे खूप रूढी परंपरा मानणारे होते. तसेच तिचे वडील कडक स्वभावाचे होते. परंतु लहानपणापासून तिच्या मनामध्ये अभिनयाची आवड होती. मात्र वडील सतत विरोध करत असल्याने तिने त्यांच्या विरोधामध्ये कठोर पाऊल उचलले होते. परंतु अभिनेत्री कायमच समाजाच्या चौकटी बाहेरचा विचार करायची आणि अजूनही ती असेच विचार करते. कोणत्याही गोष्टीमध्ये महिलांनी मागे नसले पाहिजे असे तिला वाटते. तसेच स्त्रियांनी त्यांना हवं तसं आयुष्य जगलं पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृतीचा विरोध करून खंबीरपणाने स्वतःच्या पायांवर उभे राहिले पाहिजे असे तिला वाटते.
अभिनेत्रीने साल २००२ मध्ये ‘जीना सिर्फ मेरे लिये’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘किस किस की किस्मत’, ‘मर्डर’, ‘बचके रहना रे बाबा’, ‘द मयत’, ‘प्यार के साइड इफेक्ट’, ‘शादी से पहले’, ‘डरना जरूरी है’, ‘गुरु’, ‘वेलकम’, ‘डर्टी पॉलिटिक्स’, ‘किस्मत लव पैसा दिल्ली’, या चित्रपटामध्ये अभिनय केला. तसेच साल २००५ मध्ये ‘शराबी वर्सेस शराबी’ या मालिकेमध्ये ती झळकली. तिने आपल्या दमदार अभिनयाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील जिंकला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा
चित्रपटात 17 किसींग सीन देऊन आली होती चर्चेत, खूप कठीण होता मल्लिका शेरावतचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास