Tuesday, May 21, 2024

घटस्फोटांच्या चर्चांमध्ये मानसी नाईकची नवीन लक्षवेधी पोस्ट; म्हणाली, ‘नातेसंबंध तोडण्यापूर्वी एकदाही…’

कलाविश्वात दररोज नाती बनतात. मात्र, जेव्हा या नात्यात कटुता निर्माण होते, तेव्हा नाते तोडण्याशिवाय पर्याय उरत नाही. असेच काहीसे सध्या मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक हिच्याबाबत घडताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून मानसी ही तिचा पती आणि बॉक्सर प्रदीप खरेरा याच्याकडून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मानसी आणि प्रदीपमध्ये काहीतरी खटकल्याचे म्हटले जात आहे. या सर्वांमध्ये आता मानसीने सोशल मीडियावर स्टोरी आणि एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काय आहे मानसीची स्टोरी?
अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “आज मी माझ्या मोबाईलमधल्या काही गोष्टी डिलीट करत होते, तेव्हा प्रत्येक वेळी फोन मला विचारत होता की, Are You Sure म्हणजे नक्की ना. मला आश्चर्य वाटले की, एक निर्जीव मशीन आपल्या आत साठवलेल्या आठवणी काढून टाकण्यापूर्वी तुम्हाला नक्की ना असे विचारते. मग एक जिवंत माणूस, ज्याला भावना आहेत असे म्हटले जाते, तो इतका निष्काळजी व भावनाशून्य कसा राहतो.”

Manasi-Naik-Post
Photo Courtesy: Instagram/manasinaik0302

या स्टोरीमध्ये तिने पुढे लिहिले की, “जो नातेसंबंध तोडण्यापूर्वी वा तोंड फिरवण्यापूर्वी स्वत:ला एकदाही विचारत नाही की, Are You Sure नक्की ना?” यासोबतच तिने ‘TRUE’ असे म्हटले आहे.

मानसीची पोस्ट
याव्यतिरिक्त मानसीने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये तिने गुलाबी रंगाच्या साडीतील सुंदर फोटोही शेअर केले आहेत. यासोबत तिने एक कविता शेअर केली आहे. आता याने सोशल मीडियावर एकच खळबळ माजवली आहे. त्यात तिच्या कवितेची सुरुवात “देवासमोर उभा होतो, हताश मी हात जोडून..डोळ्यामध्ये पाणी होते, मनातून पूर्ण मोडून..” या ओळींनी होते. तिची ही कविता भलीमोठी असून चाहत्यांचे लक्ष वेधणारी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

विशेष म्हणजे, मानसी आणि प्रदीप सोशल मीडियावर भलतेच सक्रिय असतात. त्यांनी एकमेकांसोबतचे व्हिडिओही शेअर केले होते. मात्र, आता मानसीने नवऱ्यासोबतचे सर्व फोटो आणि व्हिडिओ हटवल्याचे दिसते. महत्त्वाचं म्हणजे, तिने तिचे खरेरा हे आडनावही इंस्टाग्रामवरून काढून टाकले आहे. अशात त्यांचे नाते बिघडल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. मात्र, दोघांनीही सध्या या गोष्टींवर मौन बाळगले आहे. आता यांच्या नात्याविषयी काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Actress Manasi Naik shared post On divorce rumors with husband pardeep kharera see here)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा मीनाक्षी शेषाद्रीने दिला होता सनी देओलसोबत किसींग सीन; म्हणाली, ‘तो खूपच…’
व्हिडिओ: ‘पुष्पा’ची क्रेझ अजूनही कायम, भारतीयांचं सोडाच; थेट कोरियन मुलीनेही धरला ‘श्रीवल्ली’वर ठेका

हे देखील वाचा